३। एकरात ५२ ते ५५ टन द्राक्ष, बेदाणा १४ टन ७० किलो, दर १७५ - २२५ रू./किलो, नफा २० लाख

श्री. तानाजी कृष्णाजी पाटील,
मु.पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे,
मोबा. ९८९०७२४१०५


स्कॉलरशिप कर्जातून विशेष प्राविण्यासह (Distinction) इंजिनीअरचे शिक्षण व उत्तम नोकरी

आम्ही १९८७ सालापासून द्राक्ष करत असून सर्व बेदाणा करतो. आमच्याकडे एकत्र कुटुंबात ३० एकर जमीन होती. आम्ही तिघेजण भाऊ. १९८७ साली प्रथम १ एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष लावली. त्यानंतर २.५ एकर आणि पुढे ४ एकर पर्यंत द्राक्षाखालील क्षेत्र वाढविले. लागवड १० x ५ वर वाय (Y) मांडवावर आहे. जमीन मध्यम ते भारी काळी आहे. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर आम्ही १९९१ पासून करत आहे. प्रथम एप्रिल छाटणी झाल्यावर जर्मिनेटर १ लि. चे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करतो आणि जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाण्यातून फवारतो. त्यामुळे ओलांडे पूर्ण व लवकर फुटतात. काड्या एकसारख्या सशक्त व भरपूर निघतात. त्यानंतर १ महिन्यांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३०० मिली + हार्मोनी १५० मिली १०० लि. पाण्यातून फवारतो. त्यामुळे काडी पूर्ण पिकते. ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने टिकून राहतात. पावसाळ्यात डावणी, भुरीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो.

नंतर ऑक्टोबर छाटणी झाल्यावर प्रत्येक काडी डोळे एकसारखे फुटण्यासाठी जर्मिनेटर ३०० मिली १० लि. पेस्ट मधून वापरतो. त्यानंतर शिफारशीप्रमाणे व हवामानातील बदलानुसार आवश्यकते प्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेतो. तसेच आदलून बदलून रासायनिक बुरशीनाशकांचे स्प्रे घेत असतो. बागेला शेणखत, लिक्कीड खतांचा वापर करतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर छाटणीनंतर ४।। महिन्यात माल काढणीस सुरुवात होते. एका वेलीवरून २० ते २५ किलो द्राक्षमाल निघतो. गेल्यावर्षी २७ किलो अॅव्हरेज मिळाले होते.

पहिल्यापासून सर्व मालाचा बेदाणा करतो. बेदाण्यासाठी द्राक्षमणी जास्तीत जास्त लहान व गर जादा असावा लागतो. तो या तंत्रज्ञानाने मिळविता येतो. सरासरी ६० -७० मणी एका घडात असतात. घड काढल्यानंतर बेदाणे करणाऱ्यांना ४ किलो द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यासाठी २२ रू. प्रमाणे देतो. आपण फक्त माल काढून त्यांना द्यायचा. जुनोनीच्या रॅकवर आपला बेदाणा पहिल्या लाईनला असतो. घड काढल्यानंतर प्रथम ते डिपींग ऑईलमध्ये बुडवून घडासह रॅकवर वाळण्यास ठेवतात. मशीनमधून बेदाणा काढता येईल. इथपर्यंत वाळवला जातो. या प्रक्रियेस वातावरणानुसार १० ते १५ दिवस लागतात. नंतर मशीनमधून काढल्यावर नेटींग (निवड) करून पॅकिंग केले जाते व त्यानंतर बेदाण्याची विक्री होते.

सर्वसाधारणपणे एकरी १६ ते १७ टन द्राक्ष उत्पादन होते व त्यापासून ४ ते ४.५ टन बेदाणा उत्पादन होते. यंदा सव्वा तीन एकरातून १४ टन ७० किलो बेदाण्याचे उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळाले आहे. या तंत्रज्ञानाने बेदाण्याला आकर्षक कलर येतो. गर जास्त मिळतो. शेजारच्या ५ - १० शेतकऱ्यांमध्ये आपला बेदाणा १ नंबर असतो हे विशेष. सध्या १७५ ते २२५ रू./किलो भाव चालू आहे. बेदाण्याची विक्री अद्याप बाकी आहे.

खते, औषध फवारणी मजुरी, मशागत असा एकूण खर्च एकरी १।। ते २ लाख रू. पर्यंत होतो. असा साधारणपणे सव्वा तीन एकरास ५ - ६ लाख रू. खर्च येऊन १४ टन बेदाण्याला सरासरी २०० रू. जरी भाव मिळाला तरी सर्व खर्च जाऊन २० लाख रू. उत्पन्न निश्चितच मिळेल.

१।। एकर ढोबळी ३।। महिन्यात ६० टन , भाव १० ते २० रू./किलो, खर्च २ लाख, उत्पन्न ६ लाख

ढोबळी मिरची २ वर्षापुर्वी लावली होती. १।। एकर क्षेत्र मल्चिंग करून इनलाईन ठिबक केली होती. इंद्रा वाण होता. लागवड जुलैमधील होती. ५५ - ६० दिवसात चालू झाली होती. चालू झाल्यापासून ३।। महिन्यात १।। एकरात ६० टन माल मिळाला होता. सर्व माल पुणे मार्केटला पोत्याच्या कट्ट्यातून आणून विकत होतो. १० ते २० रू. किलो भाव मिळाला. ४।। फुट रुंदीचा बेड झिगझेग पद्धतीने २ x १ फुटावर लागवड होती. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने मिरची क्वॉलिटीबाज निघत होती. याला मल्चिंगचा खर्च २५ हजार, ड्रीप १७ हजार, खत १५ हजार, औषधे, मशागतीचा असा दिड एकराला एकूण २ लाख रू. खर्च झाला होता व उत्पन्न ६ लाख रू. झाले होते.