मराठवाड्यात उत्कृष्ट कांदा, आता खरीपात सोयाबीन, तुरीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. रामचंद्र रेवाप्पा मुळे,
मु. चिंचोली भंगार, पो. येळनुर, ता. निलंगा, जि. लातूर,
मोबा. ९६५७३२३५९६गेली ८ - १० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कांदा, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांना वापरतो.

कांदा लागवड जानेवारी - फेब्रुवारीमध्ये करतो. १ ते २ एकर असतो. गरवा कांदा याला सुरुवातीला सुपर नंतर २० -२५ दिवसांचे पीक झाल्यावर १५:१५:१५ एकरी ५ पोती वापरतो व नंतर खुरपणी करतो. खुरपणी झाल्यावर महिन्यांनी पुन्हा एकरी १९:१९:१९ खातची २ पोती देतो. सप्तामृताच्या २ -३ फवारण्या करतो.

३।। महिन्यात कांदा काढणीला येतो. एकरी २०० बॅगा म्हणजे १० टन उत्पादन मिळते. सप्तामृत औषधांच्या फवारण्यामुळे पाण्याचा ताण पीक सहन करते. मालाला कलर चमक येते. माल एकसारखा मिळून टिकाऊक्षमता वाढते. एकरी सर्व खर्च लेबर धरून २० हजार रू. येतो व १० टन मालाचे बाजारभावानुसार ७० ते ८० हजार रू. नफा मिळतो. पाणी विहीरीचे, जमीन काळी, ८ ते १० पाण्यावर हे पीक येते. ६ ते ७ एकर सोयाबीन असते. नुसत्या पावसाच्या पाण्यावर एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन येते. निर्मल तूर २ एकरमधून १६ क्विंटल मिळते. एकूण १० एकर जमीन आहे. यंदा कांद्याच्या अनुभवावरून सोयाबीन व तुरीला डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरण्यासाठी घेऊन जात आहे.