कांदा २० गुंठे १२.५ टन

श्री. ज्ञानेश्वर बाळासाहेब भिलारे,
पुणे - सातारा रोड, कात्रज, ता. हवेली, जि. पुणे.
मोबा. ९८८१८४९४१९कार्तिक एकादाशीला नोव्हेंबर २०१३ मध्ये २० गुंठे गरवा कांदा लावला होता. या कांद्याला कल्पतरू सेंद्रिय खताच्या १० किलोच्या ३ बॅगा आणि १९:१९:१९ दाणेदार १ बॅग आणि लोकल सेंद्रिय खताची १ बॅग याप्रमाणे खत टाकले होते. तसेच 'कृषी विज्ञान' मासिकात दिल्याप्रमाणे सप्तामृताच्या ४ फवारण्या केल्या, तर कांद्याची पात मांडीला लागत होती. पातीला तेज होते. एका कांद्याला एरवी ४ - ५ पाती असतात, तेथे १२ ते १५ पाती हिरव्यागार रसरशीत होत्या. सर्वजण प्लॉट पाहून अवाक होत असत. पात रसरशीत, माना जाड असल्याने कांदा भरपूर पोसला.

हा कांदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढला तर २० गुंठ्यातून १२.५ टन उत्पादन मिळाले. यातील ५०० किलो कांदा तर एवढा मोठा होता की, एका कांद्याचे वजन ४३० - ४३५ ग्रॅम भरत होते. बाकी ११ टन माल ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचा व १ टन माल लहान १०० ते १५० ग्रॅमचा होता. सर्व कांदा डबल पत्तीचा, गोल्टी, गिरेबाज वजनदार होता. त्यामुळे ४० किलो वजन बसणाऱ्या आकाराच्या पिशवीत हा कांदा भरला असता त्या पिशवीचे वजन ५० किलो भरत होते. हा कांदा वाफ्यावर लावलेला असून एवढा पोसला होता, जर तोच सरीवरंब्याला लावलेला असता तर अजून वजन वाढले असते. सरांनी हा कांदा पाहिल्यावर सांगितले की, 'हा कांदा नोव्हेंबरपर्यंत टिकेल' तेव्हा एकदम विकण्याची घाई करू नका ". सरांनी सांगितले, "आता उन्हाळा असल्याने कांद्याच्या रानात मेथी - कोथिंबीरीचे १० - १० गुंठ्याचे प्लॉट करा. म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिकूल वातावरणातही दर्जेदार प्रतीचे उत्पादन मिळून उन्हाळ्यातील वाढलेले दर मिळून कमी काळात चांगले पैसे होतील. ." सरांचा सल्ला मला पटला, मात्र आमचे शेताच्या दोन्ही बाजूस डोंगर भागात जंगल असल्याने मोर, लांडोर, भेकरे यांचा प्रादुर्भाव होतो. शेतातून जे - जे उगवते ते कोवळे असतानाच खाऊन टाकतात व उरलेले आपल्याला मिळते. २।। एकरच्या प्लॉटला कंपाऊंड करणे शक्य नाही.

सरांची पुस्तके मी नेहमी वाचतो. त्यातील प्रेरणेमुळेच सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा १०० झाडे मार्च २०१४ मध्ये जमिनीत लावली आहेत. ती आता गुडघ्याबरोबर झाली आहेत. त्यालादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे.