१ डिसेंबर २०१३ ते २० मे २०१४ पर्यंत (५।। महिन्यात) कपाशीतील 'सिद्धीविनायक' आंतरपीक शेवग्याचे ४ लाख रू.

श्री. प्रकाश पांडुरंग लहासे (सर), मु.पो. पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव,
मोबा. ९४२३९३७१३६


आम्ही ७ जून २०१३ रोजी सव्वा तीन एकर क्षेत्रात १२' x १२' वर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचे बी टोकले. त्याला जर्मिनेटर ची प्रक्रिया केली होती. त्यामुळे उगवण पूर्ण झाली. त्याचवेळी २ एकर शेवग्यामध्ये आंतरपीक कपाशी ४' x २.५' वर तर १ एकरमध्ये मिरचीचे आंतरपीक ४'x २.५' ठिबकवर ७ जून २०१३ रोजी रोजी शेवग्याबरोबरच घेतले होते.

शेवग्याला १ महिन्याचा प्लॉट असताना कल्पतरू खताच्या ४ बॅगा आणि ५ महिन्याचा प्लॉट असतान ३ बॅगा दिल्या. शेवग्याची पहिली छाटणी २।। फुट उंचीचा प्लॉट असताना (शेंडा खुडणी) केली. त्यानंतर १५ - २० दिवसाला शेंडे खुडणी ४ महिन्याचा प्लॉट होईपर्यंत चालूच होती. ४ थ्या महिन्यानंतर फुल दिसू लागले. ५ महिन्याचा प्लॉट असताना फुलांचे प्रमाण वाढले. ६ व्या महिन्यात संपुर्ण झाडांवर फुले लागून शेंगा धरण्यास सुरुवात झाली. एकूण १००० झाडे आहेत. दर १५ ते २० दिवसांनी गरजेनुसार सप्तामृत औषधांच्या फवारण्या घेत आहे.

१ डिसेंबरला पहिला तोडा केला. १ डिसेंबर ते २० मे पर्यंतच्या ५।। महिन्यात ४ लाख रू. झाले. सर्व शेवगा लोकल मार्केटला जळगाव, जामनेर, भुसावळ, यावल, रावेर, फैजपूर येथे विकला. ३० रू. पासून ७० रू./किलो पर्यंत भाव मिळाले. प्लॉट अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे या प्लॉटला पंचक्रोशीतील व बाहेरील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.