डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने संत्र्याच्या बागा मोगऱ्यासारख्या फुलून आंबिया बहार यशस्वी!

श्री. प्रभाकरराव शाहाकार,
मु.पो. कचारी सावंगा, ता. काटोल, जि. नागपूर,
मोबा. ९९२३३०१३२०


माझ्याकडे १।। एकर न्युसेलर मोसंबीची ८ ते १२ वर्षापर्यंतची २५० झाडे आहेत. लागवड मध्यम प्रतिच्या जमिनीत १६' x १६' वर ठिबकर आहे, यापुर्वी बहार धरताना माझ्या मोसंबीची झाडे फुटायची नाही आणि थोडी फुट निघाली तरी ती गळून जात असे.

चालूवर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये बागेस ताण देऊन जानेवारीमध्ये बहार धरताना मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. प्रथम बहार फुटण्यासाठी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. तर माझ्या झाडांची फूट अतिशय चांगल्याप्रकारे मोगऱ्यासारखी झाली. शिवाय नेहमी जी उष्णतेमुळे फुलगळ व्हायची ती या फवारणीमुळे अजिबात झाली नाही. त्यानंतर फळ लवकर धरण्यासाठी प्रोटेक्टंट - पी १ किलो + क्रॉंपशाईनर १ लि. + इमिडाक्लोरोप्राईड (८०%) १०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे एरवी जी फळधारणेपुर्वी होणारी फुलगळ झाली नाही व फळधारणा मोठ्याप्रमाणावर झाली. पुढे मोसंबी फळे टिकण्यासाठी थ्राईवर १ लि. क्रॉपशाईनर १ लि. न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यानंतर लगेच १५ दिवसांनी थ्राईवर १।। लि. क्रॉपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. + स्प्लेंडर ३०० मिली + हार्मोनी ४०० मिलीची + २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे मोसंबी फळे टिकून आहेत. तुडतुड्यांपासून फळाचे संरक्षण झाले.

सध्या पाने, फळे क्वॉलिटीबाज असून फळे लिंबाच्या, चिकूच्या आकाराची (२० मे २०१४ ) आहेत. पाने रुंद, चमकदार आहेत. ह्या फळांवर पुढेही वाढीसाठी दर्जा सुधारण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या चालू आहेत. हा माल साधारण ऑगस्टमध्ये निघेल

या मोसंबीमध्ये उन्हाळी भुईमूगाचे आंतरपीक घेतले होते. त्यालाही मोसंबीसोबत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्याने उष्णता अधिक असूनही पीक जोमाने वाढले. पाने रुंद, हिरवीगार, टवटवीत होती. पुढे शेंगा लागण्यासाठी व त्या पोसण्यासाठी अशा २ सप्तामृत औषधांच्या फवारण्या केल्या, तो जुनच्या पहिल्या आठवड्यात निघेल. सध्या शेंगा भरपूर लागल्या आहेत.