कांदा बिजोत्पादन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकरबिजोत्पादनासाठी दोन प्रकारचे (हलवा कांदा, गरवा कांदा) कांदे वापरले जातात. हळव्या कांद्यापेक्षा गरवा कांद्याचे बिजोत्पादन महत्त्वाचे आहे. मुळातच कांदा बिजोत्पादन ही नाजूक बाब आहे. साधारणपणे एक वर्षापुर्वीचे बी पेरणीसाठी चालत नाही.

चार महिन्यानंतर बियांची उगवण क्षीण होते. तेव्हा या बाबी टाळणेसाठी बिजोत्पादन चांगल्या पद्धीतीने करणे आवश्यक आहे.

* हळव्याचे गोट : एकरी ८०० किलो गोटकांदे लागतात. लागवडीचे गोटाचे शेंडे (तिसरा भाग) कापल्यानंतर एक लिटर जर्मिनेटर + १०० लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बुडवून सरी/वरंब्याच्या बगलेत ४ -४ इंच अंतरावर लावावे. लागवडीसाठी मध्यम आकाराचे साधारण ५० ते ६० ग्रॅम वजनाचे कांदे निवडावेत. १० ते १५ दिवसात उगवण पुर्ण होते. लागवडीच्यावेळी २ टन शेणखत + १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. महागडी रासायनिक खते वापरू नयेत. तसेच नत्रयुक्त खताची आवश्यकता नसते. मिश्रखत आवश्यक असल्यास १ महिन्याने व ४५ दिवसानंतर डोस (मात्रा) द्यावा. त्यामुळे गोटातून निघणारे तुऱ्याचे दांडे चांगले निघतात. यामध्ये सप्तामृताच्या ३ ते ४ फवारण्या केल्यास फुलोऱ्याचे दांडे टपोरे निघून बियांचा दाणा स्पष्ट भरला जातो आणि वजन चांगले भरल्याचे होणारे बी चांगल्या प्रतिचे मिळते.

* नवीन/ताजे बी कसे ओळखावे ?

१) जुने बी विस्तवावर टाकल्यास तडतड आवाज येतो.

२) जुन्या बियांच्या तुऱ्यातील काड्या करड्या, पिवळसर रंगाच्या सुरकुतलेल्या असतात. तर नवीन बियांच्या तुऱ्यातल्या काड्या स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या असतात.

३) नवीन वजनदार बी जर्मिनेटमुळे ३ ऱ्या दिवशी उगवून येते, तर जुने बियांची उगवण उशीरा होते, जुन्या बियांची उगवण व्यवस्थित होण्यासाठी 'जर्मिनेटर' हा एकमेव पर्याय आहे. ह्यामुळे कोट्यावधी रुपयांचे बी जगभर वाचविता येते. सप्तामृताच वापर केल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची लागवड करता येते. हळव्या कांद्याचे तुरे मार्च महिन्यामध्ये निघता.

ढगाळ हवामानामध्ये (धुई, धुके) असल्यास व सप्तामृत न वापरल्यास तुरे पोकळ निघतात. फलधारणा होत नाही. याकरीता फुलपाखरे, मधमाशा यांचे प्रमाण आवश्यक आहे.

ढगाळ आभाळ आल्यानंतर विषारी किटकनाशके वापरून नुकसानीत घालण्यासारखे आहे. सप्तामृतमध्ये प्रोटेक्टंट ह्या आयुर्वेदिक पावडरचे प्रमाणे थोडे वाढवून ४ ते ६ फवारण्या केल्यास उत्कृष्ट प्रतीचे बी तयार होते.

महाराष्ट्रातील खानदेश भागातील श्री. पंढरीनाथ येवले (B.E. Civil, Rd. Ex. Engi.) या प्रगतीशील शेतकऱ्यांनी बिजोत्पादनासाठी सप्तामृताचा वापर करून उत्कृष्ट प्रतीचे बियाणे घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने तयार केलेले बी एक वर्षानंतर देखील सप्तामृताचा वापर करून यशस्वीरित्या वापरात येऊन अधिक व दर्जेदार उत्पादन घेता येते. या पद्धतीने तयार केलेले बि ७०० ते १००० रू. किलो दराने बिजोत्पादन कंपन्या शेतकऱ्यांना देतात. घरगुती बी म्हणून १२०० ते ३००० रू. पायली या दराने विकले जाते.