'सिद्धीविनायक' शेवग्याच्या १७ वर्षापुर्वीच्या अनुभवावरून डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व 'सिद्धीविनायक' पुनर्लागवड !

श्री. बाळू नारायण पवार,
मु.पो. बासर, ता. साक्री, जि. धुळे.
मोबा. ९९२२५०३३७५भगवा डाळींबाची मार्च २०१३ ला ७०० झाडे लावली आहेत. जमीन मध्यम मुरमाड प्रतीची असून लागवड १० x १२ फुटावर आहे. याला शेणखताचा वापर भरपूर करत असे. तसेच रासायनिक किटकनाशकांची महिन्याला फवारणी करत असे. अशाप्रकारे २ वर्षे बाग वाढविली. २ वर्षात वाढ ४।। ते ५ फूट झाली. झाडाला ३ ते ४ फुटवे ठेवले. वारंवार खालची फूट काढत होतो.

या बागेला नोव्हेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये ताण दिला. १९ जानेवारी २०१५ ला छाटणी केली. खते शेणखत (२० ते २५ किलो), निंबोळी पेंड १ किलो, झाडाच्या दोन्ही बाजूस खड्डे घेऊन दिले. खोडाला चारी बाजूने २ - २ फुट अंतरापर्यंत मातीची भर ९" उंचीची केली. त्यामुळे खत देताना माती उकरली तरी मुळ्या उघड्या होत नाहीत, तसेच एरवी खोडाजवळील गवत उपटताना गवत वाढलेले असल्यास मातीचा गड्डा निघून डाळींबाच्या मुळ्या उघड्या पडतात. गवत काढताना जर डाळींबाच्या मुळीला धक्का लागला तर फुलगळ होते. गाठ सेंटिग झाली असली तर फळ गळते. याकरिता ही मातीची भर लावतो. पानगळ केल्यानंतर खोडाला ५० लि. पाण्यात १।। लि. नुवान, ५० डांबर गोळ्या, हिंग १५० ग्रम यांचे मिश्रण ४८ तास रापत ठेवून नंतर ते खोडाला १।। फुटापर्यंत लावले. त्यामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.

खत दिल्यानंतर २७ जानेवारी २०१५ ला ४ तास ठिबकने पाणी तासाला ४ लि. डिस्चार्ज प्रमाणे दिले. त्यानंतर ३ दिवस पाण्याचा गॅप देऊन ४ थ्या दिवशी १ तास पाणी दिले. त्यानंतर दररोज १ तास पाणी देत होतो. तर ४० ते ४५ दिवसात ७०० झाडांपैकी ४५० झाडांना फक्त ६० - ७० फुले लागली. बाकीच्या २५० झाडांना अजिबात फूल लागले नाही. ४५० झाडांना लागलेलि फुलेही गळत होती, त्यामुळे सेटिंग होत नव्हते. पुर्ण नर फुले निघत होती. अशा परिस्थिती मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची आठवण आली, कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा शेवगा आमच्या सासरवाडीच्या शेतावर (पुरेसपूर ता. साक्री) १९९८ साली लावला होता. तर १९० झाडांपासून आठवड्याला १०० किलो शेंगा निघत होत्या. त्याकाळात ८ ते १० रू. पासून १५ रू./किलो भाव मिळत होता. त्यापासून १। ते १।। लाख रू. उत्पन्न मिळत असत. त्यावेळी पुण्यातून मीच त्यांना बी नेऊन दिले होते. याची मुलाखत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या शेवगा लागवड पुस्तकात पान नं. ४८ वर आली आहे. या अनुभवातून मी शेवग्याला व डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरता आहे.

मग डाळींबाला फुलकळी निघण्यासाठी प्रिझम १ लि. + प्रोटेक्टंट ६०० ग्रॅम घेऊन गेलो. प्रथम प्रोटेक्टंट २ तास पाण्यात भिजत ठेवून त्याचे वस्त्रगाळ करून ते द्रावण व १ लि. प्रिझम २०० लि. पाण्यातून कळी न लागलेल्या २५० झाडांना ५ एप्रिल २०१५ ला फवारले. तर १५ दिवसात कमीत - कमी ३० ते ३५ फुले प्रत्येक झाडाला लागली आहेत आणि अगोदर फुले लागलेल्या ४५० झाडांना प्रिझम ५०० मिली + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम २५० लि. पाण्यातून एकाच (५ एप्रिल २०१५) दिवशी फवारले तर याचा प्रभाव असा झाला की, जोराचा अवकाळी पाऊस १५ एप्रिल २०१५ ला १।। तास झाला. बागेतून पाणी वाहत होते. तरी त्याचा फुलांवरही काही परिणाम झाला नाही किंवा फळांवरही काही परिणाम झाला नाही. फुले अजिबात गळाली नाहीत. सध्या झाडांवर फळांची संख्या ३५ ते ४५ असून लिंबाएवढी साईज आहे.

आकर्षक चमक आहे. झाडांवर पानांना जो अगोदर पिवळापणा होता तो जाऊन झाडे हिरवीगार टवटवीत दिसत आहेत.

आता दुसरी फवारणी करायची आहे. त्यासाठी आज १९ एप्रिल २०१५ ला थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन घेऊन जात आहे. २८ जानेवारी २०१५ ला 'सिद्धीविनायक' शेवगा १००० बी लावले आहे. माझ्या अनुभवावरून व अभ्यासावरून मी शेवग्याची लागवड थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे. १४ फुटाचा पट्टा सोडून बैल नांगराने जोड तास मारले. दोन्ही सरीत खोलगट भागात शेजारी - शेजारी १ - १ बी लावले आणि पुढे सरीतील झाडाचे अंतर ४ फूट ठेवले.

जोड ओळ लागवडीचा अद्देश एवढाच की, पुढे झाडांना एकमेकांचा आधार होईल. वाऱ्याने झाडे मोडणार नाहीत. झाडांना वेगळा आधार देण्याचा खर्च वाचेल. तसेच जोड ओळीच्या मधूनच ठिबकची १ लाईन टाकल्याने ठिबकचाही खर्च कमी झाला आहे आणि मधल्या १४ फुटाची जादा जागा वाया गेल्यासारखे वाटत असले तरी मी त्यामध्ये कोथिंबीर, मेथी, वांगी, मिरची, कलिंगड अशी पिके घेणार आहे. त्या आंतरपिकांपासून एकरी किमान ५० हजार रू. होतील.

आता पहिले आंतरपीक व्ही. एन. आर. - १८०० जातीच्या मिरचीचे घेतले आहे. त्याची लागवड मे (२०१५) महिन्यात केली आहे. सरांनी सांगितले, आता तुम्ही मिरची लावली आहे. मात्र त्यावरील चुरडा, मुरडा किंवा इतर रोग किडीचा वेळीच बंदोबस्त करा म्हणजे त्याचा शेवग्यावर दुष्परिणाम होणार नाही. एरवी शेवग्यामध्ये आम्ही मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना अशा पालेभाज्याच फक्त घेण्यास सांगतो कारण आशा पालेभाज्या शेवग्याच्या विरळ सावलीत चांगल्या येतात असा अनुभव आहे. शिवाय या पालेभाज्यांवर विशेष रोगकिडींचा प्रादुर्भाव होत नसल्याने त्याचा शेवग्यावर परिणाम होत नाही आणि १ ते १।। महिन्यात ह्या पालेभाज्यापासून चांगले उत्पन्न मिळते.