उसाची गाभेमर थांबून जोमदार वाढ
                                डॉ. सतीश गोविंदराव देशमुख,
 मु.पो. कुंभारी पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
                                                                 
मो. ९१७२७०२१२२
                            
                                मी कुंभारी पिंपळगावचा रहिवाशी असून माझ्याकडे माझ्या मालकीची १९ एकर जमीन असून यात
                                डाळींब २ एकर, ऊस ८ एकर आणि उरलेल्या क्षेत्रात इतर पिके घेतो. मी माझ्या एका २ एकर
                                प्लॉटमध्ये २६५ जातीच्या उसाची एकरी ४५०० रोपे ७ डिसेंबर २०१६ ला लावली. लागवडीनंतर
                                काही दिवसातच पिकावर गाभेमरीचा प्रादुर्भाव जाणवू लागला. हळुहळु त्याचे प्रमाण वाढत
                                जाऊन ५०% प्लॉट गाभेमर ग्रस्त झाला.
                                
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल मी बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकले होते. त्यावरून मी या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरायचे ठरविले. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. गणेश कसाब (मो. ७७९८६१०६५०) यांना भेटलो. त्यांनी उसाची पहाणी करून गाभेमरीवर एकरी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे सोडण्यास सांगिलते. तसेच १८:४६:० च्या २ बॅगा, कल्पतरू सेंद्रिय खतच्या २ बॅगा आणि ५:१०:५ खताच्या २ बॅगा असा एकरी डोस देण्यास सांगितला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वरील डोस देऊन वरील प्रमाणे २ वेळा ड्रेंचिंग केले. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. उसाची गाभेमर थांबून फुटव्यांची संख्या वाढली. एका रोपास २५ ते ३० फुटवे फुटले असून ४ महिन्यात उसाची वाढ ३ फ़ुटाच्यावर आहे. आता यापुढेही प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार उसाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. त्यामुळे उत्पादन (टनेज) अधिक मिळण्याची अपेक्षा आहे.