केळीच्या ३५०० झाडापासून ४ ते ४.५ रू. दराने ३.५ लाख रुपये

श्री. हनुमंत लक्ष्मण बनसुडे, B.sc. Agri.,
मु. पो. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे.
फोन नं. (o२१११) २७३२२३


केली २.५ एकर ५-६ वर्षापुर्वी लावली होती. जमीन भारी काळी आहे. लागवड ८' x ५' वर होती. या केळीला शेणखत, रासायनिक खतासोबत कल्पतरू सेंदीय खताचा वापर केला आणि घड लागल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची एक फवारणी केली, तर घडांचा आकार वाढून फण्यांची संख्या वाढली. तोडा १३ व्या महिन्यात केला. एकून ३५०० झाडे आहेत. प्रत्येक झाडापासून सरासरी २५ किलोचा घड मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर येथे मालाची विर्क्री केली. ४ ते ४.५ रू. किलो भाव मिळाला. एकूण उत्पन्न साडेतीन लाख रू. मिळाले. या अनुभवातून दुसर्‍या वर्षी त्याच केळीचा खोडवा घेतला. त्याला शेणखत आणि रासायनिक खते वापरली. केळी व्याल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा घडांचे पोषण होण्यासाठी वापर केला. पहिली फवारणी सप्तामृत प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून आणि दुसरी थ्राईवर, क्रॉंपशाईनर,राईपनर न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून केली, तर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असतानाही सरासरी २० किलोचे घड मिळाले.