केळी 'सिद्धीविनायक' शेवगा, चिकू, आवळा, नारळासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. बाळासाहेब दिंगबर गारुळे,
मु. पो. आठफाटा, ता. बारामती, जि. पुणे.
फोन नं. (०२०) २४३७०६११


केळी ग्रेण्डनाईन एक एकर २९ ऑगस्ट २००७ ला लावली आहे. जमीन मध्यम काळी आहे. लागवड ५' x ६' वर आहे. रोपे १० रू. प्रमाणे जागेवर पोच मिळाली.

रोपे लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड (५० ग्रॅम) आणि शेणखत चरामध्ये मिसळले होते. पाणी पाटाने देत आहे. लागवड झाल्यानंतर गेल्या महिन्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे केळीचे पुस्तक नेले. आता पुस्तकात दिल्याप्रमाणे फवारण्या घेण्यासाठी औषधे १ - १ लि. आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलोच्या २ बॅगा घेऊन जात आहे.

केळी पुस्तकाबरोबर 'सिद्धीविनयाक' शेवगा बियाचे १ पाकिट घेऊन गेलो होतो. त्याची रोपे तयार केली आहेत. ती चिकूमध्ये लावणार आहे. चिकू २० x २५ फुटावर कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल २० गुंठ्यामध्ये आहे.चिकूची झाडे वर्षाची आहेत.

आवळा १ एकर नरेंद्र, चकय्या जातीचा १८ x २० फुटावर आहे. आवळा ४ महिन्याचा आहे. नारळ २५० झाडे १ वर्षाची तर काही झाडे ६ महिन्याची आहेत.

या सर्व पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान आजपासून वापरणार आहे. 'सिद्धीविनायक' शेवग्याचे अजून स्वतंत्र पिक करणार आहे. माझ्या साडूचा मुलगा शेती शाळेचा दिप्लोमा झालेला असून अॅड. खिलारे (फलटण) यांनी लावलेला आपला 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट मी पाहिला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मेथी, कोथिंबीरीचे बागेमध्ये आंतरपीक घेतले आहे. आंतरपिके महिन्यात काढणीस आली आहेत आणि बाजारही चांगले आहेत. त्याचा निश्चितच फायदा होईल.