डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेली केळी इतरांपेक्षा सरस

श्री. रावसाहेब शंकरराव कल्याणकर,
मु. पो. पोईनी , ता. जि. नांदेड


माझी १२ एकर बागायती जमिन आहे. त्यातील १ एकरमध्ये खरीप मूग घेतला होता. नंतर श्रावण महिन्यामध्ये त्याच जमिनीत १ एकर केळीची लागवड केली.

केळीचे कंद जर्मिनेटर प्रोटेक्टंटचे द्रावण करून त्यात भिजवून लागवड केली. अवध्या आठ दिवसात कंदांची फुट चांगली झाली. नंतर १ महिन्याते प्रति झाडास २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत बांगडी पद्धती ने दिले. वाढ चांगली जोमदार झाली. २- २ महिन्याच्या अंतराने कल्पतरू ३ वेळा दिले. इतर कुठलेच रासायनिक खत एक ग्रॅम सुद्धा वापरले नाही. इतर शेतकर्‍यांच्या बागेत आणि माझ्या बागेत बराचसा फरक जाणवतोय. आठ महिन्यात केळीला माल येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक घडास ९ ते १३ फण्या पडत आहेत. शिवाय इतरांच्या मालापेक्षा आमची केळी १ इंचाने मोठी(लांब) होती.