डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी व केळीतील आंतरपिकांचे दर्जेदार, अधिक उत्पादन

ऐन उन्हाळ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे केळीची पाने लांब व हिरवीगार, घडांचे पोषण चांगले

श्री. ललीतदादा बाबुलाला पाटील,
मु. पो. कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव,
मोबा. ९४२०१०८००५


गेली ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केळीसाठी करत असून त्याचा अतिशय चांगला फायदा होत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर २००७ मध्ये महालक्ष्मी केळीचे बेणे जर्मिनेटर द्रावणात (जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + १० लि. पाणी) बुडवून लावले, त्याने उगवण अतिशय चांगली झाली. दरवर्षी आम्ही ३५ - ४० एकर क्षेत्रावर केळीची लागवड करत असतो. यावेळीदेखील ३५ एकर केळी आहे. संपूर्ण केळी ५' x ५ ' वर लावलेली असून ठिबक केली आहे. त्यातील १० एकर केळीला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. ही केळी दीड महिन्याची झाल्यानंतर पहिली फवारणी सप्तामृताची केली. त्यानंतर दर महिन्याला याप्रमाणे ४- ५ फवारण्या सप्तामृताच्या केल्या. त्यामुळे करपा किंवा बंचीटॉंप (पर्णगुच्छ) या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच ऐन उन्हाळ्यातही केळीची पाने लांब, हिरवीगार होती. त्यामुळे घडांचे पोषण चांगले झाले. एरवी २२ ते २५ ची रास (घडाचे वजन) मिळत असे. ते यावेळी २८ ते २९ ची रास मिळाली. (संदर्भासाठी कृषी विज्ञान, एप्रिल २००९ मासिकातील कव्हरवरील फोटो पहावा.)

बाग बधून व्यापारी खूष माल राजस्थान, पंजाब, हरियाणा, मुंबईला रवाना

व्यापारीदेखील बाग पाहून खूष होत आहेत. आतापर्यंत (१६ मार्च २००९) ६००० झाडांची घड कापणी झाली असून चोपडा मार्केटचे व्यापार्‍यांनी ४०० ते ४५० रू. क्विंटल भावाने केळीची खरेदी केली. तेथून ही केळी राजस्थान, पंजाब, हरियाणा , मुंबई मार्केटला पाठविली जाते.

डॉ.बावसकर तंत्रज्ञान अतिशय फायदेशीर असून त्याचा संपूर्ण क्षेत्रावर वापर करण्याचा विचार आहे. दरवर्षी ४० - ५० हजार खोड (केळी) लावत असतो. एकरी दीड हजार झाडे बसतात. चालू हंगामातील ऑक्टोबर २००८ मध्ये लावलेल्या केळीला एक फवारणी सप्तामृताची केली आहे. बाग निरोगी असून वाढ ४- ५ फूट आहे.

केळीत डांगर (काशीफळाचे) अंतरपीक गुजरातचे व्यापार्‍यांकडून ७०० ते ८०० रू. क्विं. ने खरेदी

दरवर्षी केळी ऑक्टोबरमध्ये लावल्यानंतर २ ते २॥ महिन्यांनी केळीच्या दोन रोपांमध्ये डांगर भोपळ्याच्या २ बिया टोकून लागवड करत असतो. इनलाईन ड्रीप केली आहे. जानेवारीमध्ये लावलेले डांगर मार्च अखेरीस काढणीस येते.

डांगरला २ ते ३ फवारण्या सप्तामृताच्या केळीला फवारणी करीत असतानाच करतो. त्यामुळे डांगरवर नागअळी किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय मालाची प्रत सुधारते. गुजरातचे व्यापारी जागेवरून ७०० ते ८०० रू. क्विंटल भावाने खरेदी करतात. या आंतरपिकापासून बर्‍यापैकी उत्पादनखर्च निघत असल्याने आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, जळगाव शाखेचे प्रतिनिधी श्री. विनोद पाटील (९३७०६३९५७२) हे वेळोवेळी प्लॉटवर येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्या अवस्थेत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अपेक्षीत रिझल्ट मिळत आहेत. तेव्हा डॉ.बावसकर सरांनी एकदा आमच्या प्लॉटवर मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवून आमच्या भागातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे अशी इच्छा आहे. म्हणजे त्यांचे ही उत्पादन आर्थिक परिस्थिती सुधारेल.