जर्मिनेटमध्ये भिजवून लावलेले ग्रॅन्ड नैन बेणे ट्रायकोडर्मापेक्षा सरस

श्री. पंढरीनाथ बाळासो मगर,
मु. पो. दहिटणे, ता. हवेली, जि. पुणे.
फोन नं. (०२१११) २६६१७२


केळी ग्रॅन्ड नैन ८ ॥ एकर ७ ' x ५ ' वर लागवड केली. जमीन चांगली आहे. पाणी पाटाने ६ - ७ दिवसांनी देतो. शेणखत टाकले. केळीचे बेणे, कंद (मुनवे) चांगल्या बागायतदाराकडून लोणी काळभोरहून आणले. जर्मिनेटर मध्ये १ ते १ ॥ तास भिजवले. २०० लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून लावले. जेवढे जर्मिनेटर मध्ये भिजवून लावले ते कोंब तजेलदार व लवकर आठवड्यात दिसले. ट्रायकोडर्मा (Trachoderma) मध्ये भिजवून लावल्यावर साईडने कोंब निघाले पण कोंब जर्मिनेटर वापरलेल्या कोंबाएवढा दमदार नव्हता.

जर्मिनेटर लावलेल्या बेण्याच्या रोपांची वाढ चांगली आहे. लागवड होऊन ५ - ६ महिने झाले. झाडे डोक्याचे वर आहेत.