जर्मिनेटर ड्रेंचिंग व फवारणीने चार महिन्याच्या केळीची अपेक्षेपेक्षा उत्तम वाढ !

श्री. योगेश भिकोबा घुले,
मु.पो. लासुर्णे, ता. इंदापूर जि. पुणे,
मोबा.९८८१६२८१८१


ऑक्टोबर २००८ मध्ये मका व इतर पिकांची सखोल माहिती घेतली आणि शुगर - ७५ मका बियाणे आणि जर्मिनेटर ४ लिटर मका व इतर केळीसाठी ट्रायल म्हणून घेऊन गेलो.

ऑक्टोबर २००८ मध्ये जी -९ केळी २ एकर काळ्या कसदार जमिनीत लावलेली आहे. त्यासाठी ३०० लिटर पाणी + १ लिटर जर्मिनेटरचे आळवणी केले. या प्रमाणात ऑक्टोबर २००८ आणि नोव्हेंबर २००८ मध्ये एके - एक महिन्याच्या फरकाने आळवणी केले आणि डिसेंबर २००८ मध्ये ३०० लिटर पाणी + एक लिटर जर्मिनेटर या प्रमाणात फवारणी केली. आज रोजी चार महिन्याची केळी बागेतील माल विक्रीसाठी निघत आहे,तेव्हा त्यासाठी राईपनर एक लिटर घेऊन जात आहे आणि केळीसाठी लागणारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणि कल्पतरू खत पुढील पंधरवड्यात घेऊन जाणार आहे.