जर्मिनेटर पांढर्‍या मुळ्यात प्रचंड वाढ

श्री. पांडुरंग मोहन पाटील, कठोरा, ता. जि. जळगाव


आम्ही किसान प्रदर्शनामध्ये पुण्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्टॉंलवरून माहिती घेतली.

शेली वायोटेक नडीयाद (गुजरात) यांचेकडून ग्रॅन्ड नैन केळीची ३० हजार रोपे आणली होती. इथे आणल्यानंतर प्लॅस्टिक पिशवीमध्ये लावली. तेव्हा त्याला १५ लिटर पाण्यामध्ये ५० मिली जर्मिनेटर घेऊन ड्रेंचिंग केले. त्या रोपांना १५ दिवसात पांढर्‍या मुळ्या पिशवीच्या छिद्रातून बाहेर आलेल्या दिसल्या.एवरी १ महिना किंवा जास्त दिवस लागतात. आम्ही त्यांना सांगितले तर त्यांना हे पटेना म्हणून ते म्हणाले की, तुम्ही काय वापरले. त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर वापरले असे सांगितले, ते सुद्धा आता वापरत आहेत. रोपांसाठी आम्ही हिरवी नेट शेड केली.