केळी लागवडीतील जर्मिनेटरचे योगदान

जर्मिनेटर मुनव्यांची उगवण उत्तम, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मर नाही, निरोगी केळी, उत्पादनात वाढ

श्री. मनोजकुमार ओंकारजी जैस्वाल,

मु.पो. चापोरा, ता. जि. बर्‍हाणपूर (म. प्र.)
फोन नं. (०७३२५) २८७३४६, मोबा. ९८२६३४११४६


आम्ही दरवर्षी श्रीमंती केळीची १ लाख झाडे लावतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल मला कंपनीचे प्रतिनिधी श्री. विनोद पाटील यांच्याकडून माहिती मिळाली. त्यावरून केळीच्या लागवडीसाठी प्रथम जर्मिनेटर १ लि. १०० लि. पाण्यात घेऊन या द्रावणात केळीचे मुनवे ५ ते १० लि. बुडवून लागवड केली, तर ९५ % हून अधिक मुनवे फुटलेले आठवड्याभरात आढळले. तसेच पुढे कोंब जोमाने वाढत असल्याचे जाणवले. या अनुभवावरून आम्ही आमचे श्री शिवसमर्थ कृषी सेवा केंद्र, चापोरा आणि बर्‍हाणपूर या दोन्ही ठिकाणी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची एजन्सी घेतली. या तंत्रज्ञानाचा वापर लागवडीच्यावेळी बेणे (कंद) प्रक्रियेसाठी तसेच पुढे रोपांची मर न होता वाढ जोमाने होण्यासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पंचक्रोषीतील शेतकरी करीत असून रिझल्ट अतिशय चांगला मिळाल्याचे कळवितात.

केळी लागवडीनंतर १ महिन्यांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर,प्रोटेक्टंटची पहिली फवारणी करण्यास सांगतो. तसेच जर्मिनेटर १लि. चे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग १ ते २ वेळा करण्यास सांगतो. त्याने केळीच्या मुनाव्यांची मर होत नाही. तसेच वाढ जोमाने होते. पाने निरोगी राहतात.

पुढे १ महिन्याच्या अंतराने २ वेळा थ्राईवर, क्रॉंपशाईनर,प्रोटेक्टंटच्या फवारण्य करण्यास सांगतो. त्यामुळे प्रतिकुल हवामान असले तरी त्याचा केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होता नाही. शिवाय करपा, बंची टॉंप (पर्णगुच्छ) या रोगांस प्रतिकार होतो. केळीची वेण झाल्यानंतर घड बाहेर पडल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून १ फवारणी घेतल्यास घडांचा आकार वाढण्यास मदत होते. त्यानंतर राईपनरची फवारणी घड काढण्याच्या १ महिना अगोदर घेतल्याने घडांचा आकार वाढून फण्यांचे पोषण होते व वजन वाढते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.