पाऊस उशिरा तरी केळीची उत्तम वाढ

श्री. पांडुरंग बाबुराव टेकाळे, मु.आळंद. पो. मांडाखळी, ता. जि. परभणी


मी -७ ८ वर्षापासून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. श्रीमंती व अर्धापुरी या जातीच्या केळीची लागवड केली होती. लागवड करते वेळी जर्मीनेटर या औषधाचे द्रावण तयार करून या द्रावणात खोडे बुडवून लावली, नंतर पाणी दिले. लावणी नंतर पाऊस एक महीन पडला नाही. तरीही आमच्या केळीमध्ये आपल्या जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे एकूण ४,७०० खोडांमध्ये फक्त २० ते २५ खोडांची मर झाली. उगवण फक्त २२ ते२५ दिवसांत चांगली, एकावेळी व जोमदार झाली.

आमच्याबरोबर लागवड केलेल्या इतर शेतकऱ्यांच्या केळीमध्ये बरीच मर झाली व प्रत्येक जण आम्हाला डॉ. बावसकर तंत्रज्ञनाबद्दल विचारणा करू लागले. आम्ही त्यांना 'कृषी विज्ञान' मासिकाबद्दल व डॉ. बावसकर सरांबद्दल माहिती दिली. यापुर्वी आम्हांला असा अनुभव कधीच मिळाला नव्हता. त्यामुळे या तंत्रज्ञानाबद्दल मी व माझा भाऊ परमेश्वर टेकाळे आम्ही दोघे प्रभावित झालेलो आहोत. केळी बरोबरच ऑक्टोबरमध्ये उसासाठी हेच तंत्रज्ञान वापरणार आहोत.