केळीतील यशस्वी आंतरपीक टरबुज (कलिंगड)

श्री. अनिल युवराज चौधरी,
मु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगाव,
फोन नं. (०२५८०) ३१४७७६चालू वर्षी ८ एप्रिल २००९ रोजी अर्धा एकर केळीमध्ये मधुबाला कलिंगडाची लागवड ५' x ५' वर केली. जमीन मध्यम प्रतीची आहे. केवी आणि कलिंगडाला ठिबक केली होती. त्यावेळी केळी ६ महिन्यांची डोक्याला लागत होती. त्यामुळे शेजारचे शेतकरी सांगत होते, की केळी मोठी झाल्याने कलिंगडाची वाढ होणार नाही, कारण यापुर्वी त्यांनी लावलेली उंच केळीतील कलिंगडे पूर्ण वाया गेली होती.

अशा परिस्थितीतही त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून केळीमध्ये टरबुज (कलिंगड) लावण्याचा निर्णय घेऊन लागवड केली. मात्र उगवण फारच कमी आढळली. नंतर मी गावातील हरिओम कृषी सेवा केंद्र यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटरचे द्रावण ( १ लि. जर्मिनेटर + ५० लि. पाणी) बी टोकलेल्या ठिकाणी (ठिबकजवळ) कपभर सोडले, तर २- ३ दिवसात उगवण जाणवली. जे बी अगोदरच उगवले होते, त्याचीही वाढ होऊ लागली. शेजारचे शेतकरी प्लॉट पाहायला येऊन आश्चर्यचकीत होत असत.

त्यानंतर मी हरिओम कृषी सेव केंद्र यांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने केळीच्या सावलीतही वेलींची वाढ जोमाने होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. नागअळीचा प्रादुर्भाव पुर्णत: आटोक्यात राहिला. त्यानंतर पीक ४५ ते ५० दिवसांचे थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंटची दुसरी फवारणी केली. त्याने फुलकळी लागून फळधारण झाली. त्यानंतर क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची शेवटची फवारणी केली. त्याने फळांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे जाणवले. ११ ते १३ किलो वजनाची फळे मिळाली. गर लालबुंध होऊन गोडी वाढली.

या अर्धा एकर कलिंगडासाठी बियाण्याचा खर्च २२०० रू. , औषधे १२०० रू., रासायनिक खते २४०० रू., लागवड खर्च ३०० रू., इतर खर्च (वीजबील, रखवाल) ५०० रू. असा एकूण ६,६०० रू. खर्च झाला आणि उत्पन्न ५१,००० रू. मिळाले. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळाल्यामुळे केळी तसेच यापुढील सर्वच पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत आहे.