'मल्हार' लिंबाने आळवला आत्मविश्वासाने निर्यातीचा 'सूर' !

श्री. बाळकृष्ण निवृत्ती कदम,
मु. पो. बेलवंडी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर,
मोबा. ९०९६९०८१९०


२ वर्षापुर्वी आम्ही एका पोलिस अधिकाऱ्याकडून १५ लाख रू . एकराने ५ एकर घेतली. त्या पोलिस अधिकाऱ्याने ६ वर्षापुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यांचेकडून 'मल्हार' लिंबाची १५० रोपे नेऊन १५' x १५' वर त्याची लागवड केलेली आहे. जमीन तांबूस मातीची साधारणच आहे. पाणी विहीरीचे असून पाटाने देत आहेत. या लिंबाला पहिले ३ - ४ वर्षे त्यांनी पारंपारिक पद्धतीने रासायनिक खते, औषधे वापरली. आम्ही घेतलेल्या जमिनीमध्ये ही लिंबाची बागही आली. त्या पोलिस अधिकाऱ्याकडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची महिती मिळाली. या लिंबू बागेला आम्ही २०११ -१२ मध्ये दुष्काळी परिस्थितीने टँकरने पाणी देऊन बाग जगविली. यामध्ये ६ झाडे गेली. सध्या १४४ झाडे आहेत.

४ वर्षानंतर लिंबाला बहार लागला. २०१२ साली जून - जुलैपर्यंत पाऊस नसल्याने बागेला आपोआपच ताण बसला होता. ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यावर नवीन फुट वाढू लागली. त्यानंतर फुलकळीदेखील निघू लागली. फुलकळीचे प्रमाण वाढून त्यावर्षी झाडांवर १५० ते २०० फळे लागली होती. मल्हार वाणाच्या या लिंबाचा आकार नेहमीच्या लिंबापेक्षा दुप्पट असल्याने पाहणारे आश्चर्यचकित होत. डिसेंबरमध्ये फळ तोडणी चालू झाली. आठवड्याला तोडा करीत होतो. तर ७० किलो लिंबू मिळत असे. जून २०१३ पर्यंत माल चालू होता. बेलवंडी मार्केटला १२ ते १३ किलोच्या डागाला थंडीत ११० ते १५० रू. भाव मिळत होता. तर उन्हाळ्यात ४०० ते ४५० रू./डाग (१२ -१३ किलोस) मिळत होता.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मल्हार लिंबाचा हा सर्वोत्तम दर्जाचा वाण दिल्याने यंदा याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे. असे ठरविले. १४४ झाडांना प्रथम चाळणी करून जुलैमध्ये लेंडीखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा व निंबोळी पेंड १ बॅग झाडांभोवती गोलाकार रिंग करून दिले आणि त्यानंतर जर्मिनेटर १ लि. १०० लि. पाण्यामध्ये घेऊन प्रत्येक झाडाला आळवणी केले. त्यामुळे झाडे चांगलीच डवरली. फुट भरपूर होती. ऑग़स्ट - सप्टेंबरपासून कळी लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सप्तामृताची पहिली फवारणी लगेचच केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे खत, आळवणी व फवारणीमुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्येक पानोपान कळी लागली. कळी पाहून गावातील लोक विचारू लागले. 'कोणता वाण आहे. याला तुम्ही कोणते तंत्रज्ञान वापरत आहात.' दिवाळीत दुसरी फवारणी सप्तामृत ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून घेतल्याने फुलांची गळ झाली नाही. फळे चांगली पोसलीत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यापुर्वी पाने साधारणच असायची. मात्र यावर्षी पाने चमकदार, हिवरीगार दिसत होती. झाडांवर विशिष्ट प्रकारचे तेज दिसत होते. १५' x १५' च्या चौकोनी वाफ्यात पाणी भरत असे.

सुरूवातीला ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागलेल्या कळीचा दिवाळीपासून माल चालू झाला. आतापर्यंत ६ तोडे केले आहेत. गेल्यावर्षी आठवड्याला ७० किलो फळे मिळत होती. यंदा आठवड्यातून २ वेळा ७० किली फळे मिळतात. फळे चमकदार पातळ सालीची वजनदार (११० ते ११८ ग्रॅम वजनाचे फळ) आहे. व्यापारी फळे पाहून म्हणतात, "निर्यात करायाची आहेत का ? आपण ही फळे परदेशात पाठवू. " ही फळे किसान कृषी प्रदर्शनात (डिसेंबर २०१३) मांडली होती. तर अनेक शेतकऱ्यांचा कुतुहलाचा विषय झाला होता. पाहणारे म्हणत प्रथमच एवढी मोठी फळे पाहत आहोत.

यंदा पाऊस चांगला झाल्याने आणि सप्तामृत फवारणीमुळे ७०० ते ८०० फळे झाडावर आहेत. फळांच्या ओझ्यामुळे फांद्यांना डेंग्या लावाव्या लागत आहेत. फळे काढण्यासाठी आकडीने झाड हालवतो आणि खाली पडलेला माल वेचतो. पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी माल तोडतो. आठवड्याला १० - ११ बॅगा निघत आहेत. उन्हाळ्यात तोड्याचा माल वाढेल. ऐन उन्हाळ्यात भरपूर माल निघेल. उन्हाळ्यात गेल्यावर्षी ४५० रू./१३ किलो गोणीस भाव मिळाला होता. उन्हाळ्यात भाव नेहमीच जादा असतो.

वडील १० वर्षीपुर्वी वारले. वडील धार्मिक होते. वडिलांनी अशी शिकवण दिली की, जमीन आपली माता आहे. तिची मनापासून चांगली सेवा केली तर यश निश्चित मिळते. या शिकवणीतून मी शेतात गेल्याबरोबर प्रथम हात जोडून प्रार्थना करतो, "हे भुमाते मी माझ्या कुटूंबाच्या व माझ्या उदर निर्वाहासाठी तुझी मनोभावे सेवा करत आहे तू मला यश दे " आणि त्यांनंतरच पुढील कामाला सुरुवात करतो, याची मला प्रतितीही येते. माझ्याकडे लिंबाबरोबर डाळींबाचीदेखील बाग आहे. तिलादेखील आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. त्यासाठी सरांना भेटून मार्गदर्शन घेण्यासाठी (३१ डिसेंबर २०१३) आलो आहे.