कांदा, धना, मेथीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. पांडुरंग नामदेव आदक,
मु. पो. वडगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे,
मो. ८१०८४७२६९९


मी गेल्या ५ ते ६ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करत आहे. तसेच मी नोकरी करून शेती करीत आहे. मागील ५ ते ६ वर्षापूर्वी मी कांदा हे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनुसार केले होते. तेव्हा इतरांपेक्षा मला कांद्याची चांगली क्वालीटी व कांद्याचा कलर सरस मिळाला. त्यामुळे मला इतरांपेक्षा बाजारभावसुद्धा चांगला मिळाला. तेव्हापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच औषधे वापरतो. दरवर्षी धना, मेथी ह्या पिकांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करीत असतो आणि त्याचे मला चांगले रिझल्टसुद्धा मिळतात. मेथीचे बियाणे जर्मिनेरमध्ये भिजवुन लावले असता बियाण्याची १०० % उगवण होते. उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी केल्यामुळे वाढ व पानांचा आकार आणि चकाकी टिकुन राहते. नंतर आठवड्यात थ्राईवर, क्रॉंपशाईनरची २ वेळा फवारणी केली असता शेंडा फुटीची वाढ जोमाने होऊन पाने रुंद, हिरवीगार होतात. त्यामुळे कमी काडीत गड्डी तयार झाल्याने उत्पादनात वाढ होते. भाजी टवटवीत असल्याने बाजारभावही वाढून मिळतो.