३० गुंठे हळदीपासून ३ लाखाचे उत्पन्न

श्री. शिवाजी अकाराम पाटील, मु. पो. मुडशिंगी (माले), ता. हातकणंगले जि. कोल्हापूर.
मो. ९८९०९६९७२५


आम्ही ३० गुंठ्यामध्ये सेलम जातीच्या हळदीची लागवड गेल्यावर्षी मे (२०१०) महिन्यात अक्षयतृतीयेला केली होती. या हळदीसाठी बेड केले होते. बेड ४ फुट रुंदीचे असून दोन गड्ड्यात २० सेमी आणि दोन ओळीत ४५ सेमी अंतर ठेवले होते. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. ३० गुंठ्यासाठी ७ क्विंटल बेणे ४८०० रू./क्विंटल भावाने आणले होते. याला जर्मिनेटरची बेणे प्रक्रिया केल्याने लागवडीनंतर पाणी देण्यास उशीर झाला तरी उगवण १०० % झाली.

बेडवर शेणखत, डी.ए.पी. पोटॅश या खतांचा वापर केला होता. जमीन मध्यम प्रतीची आहे. मी सिंजेंटा कंपनीत काम केलेले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी या औषधांबद्दल माहिती होती. त्यापासून होणाऱ्या फायद्याविषयी शेतकरी वर्गात चर्चा होत असे. त्यामुळे 'सप्तामृत' हळद पिकास वापरण्याचे ठरविले. जर्मिनेटरचा अनुभव आल्यानंतर पुढे फवारणीस सप्तामृताचा वापरही केला. त्यामुळे खराब वातावरण असतानाही रोगावर पुर्णपणे नियंत्रण मिळवता आले. शिवाय हळकुंडं मोठी, लांब झाली. एका झाडास २ किलो एवढे हळदीचे गड्डे लागले होते. (संदर्भसाठी - कव्हरवर फोटो दिला आहे) या हळदीचा प्लॉट सुरूवातीपासून च जोमदार होता. डिसेंबर अखेरीस पाला कापणी करून २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०११ या काळात काढणी केली. यापुर्वी आम्ही सरीला हळद लावत होतो आणि इतर औषधांचा वापर करत असे. तर ३० गुंठ्यातून १० ते १२ क्विंटलपेक्षा जादा माल कधी मिळाला नाही. चालू वर्षीच्या प्लॉटमधून १८ ते २० क्विंटल पॉलिश केलेल्या हळदीचे उत्पादन मिळाले. सध्या १७ ते १८ हजार रू. क्विंटल. बाजारभाव आहेत. या हळदीला बेण्याचा ३४ हजार रू. आणि काढणी व इतर खर्च ५० हजार असा ८० - ८५ हजार रू. खर्च आला. या उत्पादनाचे चालू बाजार भावानुसार ३ लाख रू. होतात. दहा लाख उसाचे रोपांसाठी २०० लि. जर्मिनेटर

आम्ही दरवर्षी १० लाख उसाची रोपे प्लॅस्टिक ट्रेमध्ये तयार करतो. त्यासाठी जवळपास २०० लि. जर्मिनेटर वापरतो. जर्मिनेटर नाही वापरले तर फक्त ५० % च रोपे मिळतात. बेणे तेच वापरून जर्मिनेटरची प्रक्रिया केली असता १०० % उगवण होऊन जोमदार रोपे मिळतात.

वरील अनुभवावरून यावर्षी देखील (मे २०११ मधील लागवडीस) हळदीला डॉ. बावसकर तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे.