अर्धा एकर काकडीपासून सव्वा महिन्यात ५७ हजार

श्री. भगवान मारुती हुलावळे, मु. पो. कोंढावळे, ता. मुळशी, जि. पुणे. मो. ९५४५८५९४४७

जिप्सी काकडीच्या ३ पुडया बी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून १७ एप्रिल २०१० रोजी अर्धा एकरात लावले. जमीन मध्यम प्रतीची असून लागवड ३' x १.५' वर होती. एका ठिकाणी एकच बी लावले होते. या काकडीला सप्तामृताच्या फुलकळी अवस्थेत एकदा आणि माल चालू होताना एकदा अशा दोन फवारण्या केल्या. एवढ्यावर वेळांची वाढ निरोगी होऊन मालही भरपूर लागला. मे अखेरीस तोडे सुरू झाले. ४०० - ५०० किलो माल दिवसाड मिळाला. तोडा झाला की लगेच मागे पाणी देत असे. त्यामुळे काकडीची वाढ झपाट्याने होत असे. सव्वा महिना तोडे चालू होते. सर्व काकडी पुणे मार्केटला विकली. १० ते १२ रू. किलो सुरुवातीस भाव मिळाला. शेवटच्या १- २ तोड्याला १८ ते २० रू. किलो भाव मिळाला. या काकडीपासून ५७ हजार रू. झाले म्हणून चालूवर्षी स्पायसी (सायनोवा सीडस कं.) काकडीसाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञान घेऊन जात आहे.

Related New Articles
more...