शेतकऱ्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मोडनिंबवरून आणून देत असे म्हणून माझे नाव 'बावसकरच' ठेवले ! एक एकर काकडीचे २ लाख रू. उत्पन्न

श्री. भारत उत्तम रंदवे,
मु. पो. पालवण, ता. माढा, जि. सोलापूर.
मो. ९८८१२७७८०२मी १० वर्षापूर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी काकडीस वापरली. फार भारी वाटली. मोडनिंबवरून औषधे आणून वापरत असे, तसेच जवळच्या शेतकऱ्यांनाही आणून देत असे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे नाव 'बावसकरच' ठेवले.

पालवणच्या डाळींब बागायतदारांनी तेल्यामुळे बागा सोडून दिल्यात. तेव्हा आमचा सर्वांचा एकच विचार झाला की, ५० हजार रू. एकरी खर्च करूनही उपयोग होत नाही, तर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून पाहू. बाग सुधारून उत्पादन मिळाले तर उत्तमच. नाहीतर मग काढून टाकू. मी अडाणी असून पहिल्यापासून आपली ट्रीटमेंट केली तर निश्चितच फरक पडेल हा माझा स्वत:चा काकडीचा अनुभव आहे. त्यावर तुमचा सल्ला घेण्यास आलो आहे. त्याचबरोबर आपला प्रतिनिधी आमच्या प्लॉटवर पाठविणे.

काकडीचा १ एकरात २८ टन उतारा मिळाला. ८० ते ९० रू./१० किलो भाव मिळाला त्याचे २ लाख झाले.