जर्मिनेटर, कल्पतरूच्या वापरामुळे केळी उत्कृष्ट

श्री. शरद मारुती तांबे,
मु. पो. ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे.
मो. ९७३०३२०३५०


मी ऑगस्ट २००९ मध्ये जैन टिश्यु कल्चर केळीची रोपे माझे बंधु कैलास गोविंद तांबे यांचेकडून घेऊन जर्मिनेटरमध्ये बुडवून लागवड केली. केळीची लागवड ६ x ६ फुट अंतरावर १' x १' x १' चे खड्डे करून त्यामध्ये कल्पतरू सेंद्रिय खत (५ बॅग) व शेणखत यांनी खड्डे भरून घेतले. त्यानंतर लागवड केली. नंतर प्रत्येक दिवशी दोन तास ठिबक सिंचनचा वापर करून पाणी पुरवठा केला. कल्पतरूच्या वापरामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होऊन झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढली. त्यामुळे घडांचा आकार चांगला झाला. कल्पतरूच्या वापरामुळे केळी फुगवणीसाठीही मदत झाली. विशेष म्हणजे कल्पतरू व शेणखताशिवाय कुठलेही रासायनिक खत वापरले नाही. या पिकापासून खर्च वजा जात निव्वळ नफा १.५० लाख रुपये मिळाला.

कल्पतरूमुळे सोयाबीन १।। एकरात १८ क्विं.

मी सोयाबीनचे बियाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, नारायणगाव येथून जे. एस. २३५ या वाणाची खरेदी करून पेरणी केली व त्यासाठी कल्पतरू ४ बॅग दिड एकरासाठी वापरल्या. या खताच्या वापरामुळे झाडांची पांढरी मुळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे झाडांची वाढ एकसारखी झाली व झाडास बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत शेंगा लागून पुर्णपणे भरलेल्या शेंगा निघाल्या. सोयाबीनला कोणत्याही किटकनाशकांचा व रासायनिक खतांचा वापर केला नाही.

तरी भरघोस उत्पन्न मिळाले. त्या दीड एकरामध्ये १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ३५ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. इतरांना एकरी आठ क्विंटल मिळाले.

कांद्याचे जुने बी उगवले जर्मिनेटरमुळे

कांद्याचे तीन वर्षाचे जुने बियाणे जर्मिनेटरमध्ये भिजवुन टाकले असता बियाण्याची १०० टक्के उगवण झाली. नंतर पावासामुळे शेजारील शेतकऱ्यांची रोपे खराब झाली, परंतु जर्मिनेटरमध्ये भिजवल्यामुळे माझ्या रोपांची मर झाली नाही.

दि. १५ - १- २०११ रोजी कांद्यासाठी सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.