अवघ्या ३।। महिन्यात कांदा काढणीस

श्री. दशरथ भिकु कुंभार,
मु. पो. वाफगाव, ता. खेड, जि. पुणे.
मो.९७३०३६९५६८मी गेल्यावर्षी पोलीस खात्यातून पुणे येथून निवृत्त झाल्यानंतर घरची शेती करू लागलो. पहिले पीक सुपर ज्योती बटाट्याचे घेतले. समाधानकारक उत्पादन मिळाले. त्याचवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची ४०० झाडे लावली आहेत. त्याकडे थोडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्या बहाराला पाहिजे तसे उत्पादन मिळू शकले नाही. या शेवग्यात आंतरपीक बीट आणि शेपूचे घेतले आहे. या पिकांना पाणी वरवर द्यावे लागत असल्यामुळे शेवग्यास जादा पाणी होत आहे. परिणामी फुलगळ चे प्रमाण वाढले आहे.

गावरान कांधाची लागवड २४ ते २८ ऑक्टोबर २०१० मध्ये २।। एकर क्षेत्रात तर ७ ते ९ नोव्हेंबर २०१० मध्ये दीड एकर असा एकूण ४ एकर कांदा आहे. जमीन मध्यम प्रतीची रेताड असून पाणी वेळधरणाचे लिफ्ट करून आणले आहे. या कांद्यास सुरुवातीस काही वापरले नाही. मात्र लागवड झाल्यानंतर नारायणगाव येथे गेलो असता तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती घेतली. तेथील प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार एकरी कल्पतरूच्या २ बॅगाप्रमाणे ८ बॅगा आणि सप्तामृत औषधे २ फवारण्याची घेऊन आलो. खुरपणी झाल्यावर कल्पतरू सेंद्रिय खत २ बॅगा १०:२६:२६ ची १ बॅग आणि १५ :१५:१५ ची १ बॅग असा प्रती एकरी डोस दिला आणि डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे वेळापत्रकातील दुसऱ्या फवारणीपासून सप्तामृत सुरू केले. कृषी विज्ञानमधील माहितीप्रमाणे दुसरी, तिसरी फवारणी केली आणि चौथ्या फवारणीसाठी किसान प्रदर्शन मोशी येथून औषधे नेऊन चौथी फवारणी केली तर आज रोजी (७ फेब्रुवारी २०११) सुरुवातीला लावलेला कांदा काढणीस आला आहे. आमच्या भागात बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांधाचे मावा, तुडतुड्याने नुकसान झाले. इतर औषधे वापरून ते अक्षरश: कंटाळले, मात्र त्यांना कीड काही आटोक्यात आणता आली नाही. आमचा कांदा मात्र १ नंबर आहे. गावात आमच्या प्लॉटची चर्चा होते. एकरी २०० - २५० पिशवी माल निघेल असे लोक म्हणतात. कांदा एकसारखा मोठा झालेला आहे. अवध्या साडेतीन महिन्यात कांदा काढणीस आला आहे.

आम्ही शेतीत नवीन असून डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे यशस्वी होऊन गावातील शेतकऱ्यांपेक्षाही अधिक चांगले उत्पादन घेऊ शकलो याचे समाधान वाटते.