१ एकर कोथिंबीरीपासून १ महिन्यात ५५ हजार नफा

श्री. गंगाधर महादेव डुंबरे,
मु. पो. ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे.
मो. ९४२२०७९७९५मी गेल्या ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करती आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आंध्र गोल्ड जातीचे धन्याचे बियाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, नारायणगाव येथून खरेदी करून ते लागवडीच्या वेळेस जर्मिनेटरमध्ये भिजवून लावल्यामुळे १०० % उगवण झाली. नंतर ५ ते ६ दिवसानंतर जर्मिनेटर + थाईवर + क्रॉंपशाईनर यांची वेळोवेळी फवारणी केली. त्यामुळे पानांचा आकार रुंद व लांब होऊन चकाकी निर्माण झाली. त्यामुळे मार्केटमध्ये चांगल बाजारभाव मिळाला. १ एकर क्षेत्रामध्ये खर्च वजा जाता ५५,००० रू. चे उत्पन्न मिळाले. तसेच मी कांदा, गहू या पिकांनाही या औषधांचा वापर करतो.

यावर्षी कांदा या पिकाला सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली, त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. फुगवणीसाठी राईपनर व न्युट्राटोन फवारले असत फुगवण व कलर चांगला मिळाला. शेजारील कांद्यापेक्षा माझ्या कांद्याची क्वॉलिटी चांगली असल्यामुळे शेजाऱ्याने सुद्धा मला ही औषधे आणायला सांगितली. आमच्या गावामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर १० वर्षापासून करणारे शेतकरी आहेत. माझ्या अनुभवानुसार ही टेक्नॉंलॉजी वापरणे काळाची गरज आहे. त्यामुळे चांगल्या क्वॉलिटीचे उत्पादन निघते.