बेदाणा खरेदी करणारे दलाल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केलेल्या बेदाण्यास जास्त दर देतात

श्री. भारत पांडुरंग पाटील,
मु.पो. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली


द्राक्षाची जात : सोन्नाका,

बागेचे क्षेत्र : ६ एकर,

लागवडीचे अंतर : ९' x ५',

फळछाटणीची तारीख : ०४/१०/२०११,

पाण्याची सोय : ड्रीप,

बागेचे वय : ५ वर्षे

आम्ही आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व औषधे नेहमीच वापरत आहे. त्यामुळे आमच्या बागेतील माल हा दर्जेदार, बनत आहे. आमचा बेदाणा दरवर्षी इतरांपेक्षा १५ ते २० % उत्पादन वाढत आहे. तसेच बेदाण्याचा दर्जा उच्च प्रतीचा असल्यामुळे बेदाणा दर हा दुसऱ्यांच्या बेदाणा दरापेक्षा जास्त मिळतो.

आम्ही ही टेक्नॉंलॉजी वापरल्यापासून आमच्या बागेत रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. द्राक्षे पान चांगले मोठे बनत आहे, पानावरती चकाकी येत आहे, त्यामुळे खराब वातावरणातही बाग, बागेचा माल हा चांगला राहतो, बाग चांगली प्रतिसाद देते.

बेदाणा खरेदी करणारे दलाल सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नाव ऐकून माल खरेदी करतात, कारण त्यातील गर, त्याची चकाकी कायम राहते, निर्यातीत बेदाणा खराब होत नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे कल्याणच होत आहे. तो सतत प्रगतीकडे वाटचाल करतो, मार्केटमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केलेला बेदाण्याची चांगली मागणी आहे असा माझा अनुभव आहे.