डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चिकूची झाडे झाली कामधेनू

श्री. दत्तात्रय हिरामण सस्ते,
मु.पो. मोशी, ता. खेड, जि. पुणे


चिकूची बाग लावून जवळ जवळ १५ वर्षाहून अधिक काळ झाला. या बागेला आम्ही अगोदर रासायनिक खते वापरात असू. तेवह ३६ हजार फळे मिळत. ती ही लहान - मोठी, चव कमी गोड असे. गेल्या ३ - ४ वर्षापुर्वी आल्हाटांच्या शेतीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे विविध पिकांवरील यशस्वी अनुभव प्रत्यक्ष पाहिल्यावर आम्ही तेव्हा चिकूवर पंचामृत फवारणीचा प्रयोग तीन वेळा केला. तर एकूण ८० हजार चांगल्या दर्जाची फळे मिळून ६० हजार रुपये अवध्य एक महिन्यात मिळाले. चिकूची झाडे निरोगी, टवटवीत असून चिकूचे घड या विज्ञानाने लागतात व लगेच फुले चालू राहतात. त्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चिकूची झाडे म्हणजे आम्हांस जणू कामधेनूच वाटत आहेत.