चिकू उत्पदानाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतातील शेतकरी कोणत्याही जमीनीमध्ये, कोणत्याही हंगामामध्ये योग्य आशा आराखड्याने, योजनाबद्ध पद्धतीने, सर्व तऱ्हेने काळजी घेऊन कोणतेही पीक घेऊ लागला आहे. चालू परिस्थितीमध्ये कोणत्या फुलांना, फळांना, भाजीपाला पिकांना मार्केट चांगले आहे, त्याच पिकांचे चांगले उत्पादन घेऊन आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याचे नियाजन होणे गरजेचे आहे. मात्र ह्याच वेळी भरमसाथ रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करणे चुकीचे आहे. त्यामुळे कालांतराने जमिनीचा कस कमी होणे इ. अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी नैसर्गिक औषधांचा, खतांचा वापर करणे हिताचे आहे.

उत्पती : चिकूची लागवड प्रथमत: मेक्सिको व मध्य अमेरिकेमध्ये झाली. वेस्ट इंडिजमध्ये इ. स. १५१३ ते १५२५ च्या सुमारास लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यानंतर फिलीपाईन्समध्ये स्पॅनिश लोकांनी मेलेशियामध्ये चिकूची लागवड सुरू केली.

भारतात व्यापारीदृष्ट्या इ.स. १८६३ साली व महारष्ट्रात इ.स. १८९८ साली घोलवडमध्ये चिकूची यशस्वीरित्या लागवड करण्यात आली.

चिकूचे व्यवहारातील महत्त्व : चिकू हे बारामाही फळ देणारे फळपीक असून सर्वसामान्य माणसाला सहज परवडण्यासारखे आहे. द्राक्षे, केळी, आंबे ह्या फळांसारखा सीझनल (हंगामी) चा प्रश्न ह्या फळपिकाला येत नाही, व इतर फळांपेक्षा नुकसान कमी होते.

चिकूचे आहारातील महत्त्व : चिकू हे फळ खाण्यास पौष्टिक व उत्साहवर्धक असून साखरेचे प्रमाण १२ ते १४ % असते. यामध्ये प्रामुख्याने ग्लुकोज व फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. सुक्रोजचे प्रमाण फक्त दोन टक्के असते. चिकूमध्ये 'सॅपोनिज' हे अल्कलॉइड असते.

औषधी उपयोग: किनारपट्टीवरील भागात वितळलेल्या लोण्यामध्ये रात्रभर चिकूचे फळ भिजवून सकाळी खाण्यासाठी वापरतात. ह्याचा उपयोग मनोविकारावर व अतितापामुळे येणाऱ्या झटक्यावर केला जातो.

वेस्ट इंडिज, गिनिया, कांपुचियामध्ये चिकूच्या बिया लघवी साफ होण्यासाठी, तर साल टॉंनिक, तापावरील औषध तसेच जखम भरून येण्यासाठी वापरली जाते. चिकूचा काढा हगवणीवर गुणकारी आहे.

अपरिपक्व फळ व सालीपासून जो दुधाळ चीक निघतो. त्याच्यापासून च्युईंगम तयार करतात. परंतु च्युईंगममुळे दात किडतात. पिकलेल्या फळांचा जाम तयार करतात. ग्लुकोज, पेक्टीन, नैसर्गिक फळांची जेली तयार करण्यासाठी उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात चिकू हा कच्चा माल म्हणून वापरतात. तसेच चिकुचे तुकडे (स्लाईस) तयार करून खाण्यासाठी वापरतात. डच ईस्ट इंडिजमध्ये कोवळ्या पानांचे फुटवे इतर भाजीपाल्यांमध्ये उदा. लिब लिब नावाच्या भाजीमध्ये मिसळून भाजी म्हणून खाण्यासाठी वापरतात.

जमीन : सामू ६.५ ते ७.५ असलेल्या समुद्रालगतच्या रेताड, खारवट जमिनी, नदीकाठची गाळाची व मळीची जमीन चांगली, उत्तम निचरा होणारी काळी जमीनसुद्धा फायदेशीर आहे. खडकाळ जमिनीत मुळे कमकुवत होऊन झाडांची पाने निस्तेज होतात व फळांचा आकार वाढत नाही. फुटीसाठी त्रासदायक ठरते. कठीण खडकाच्या, चुनखडीयुक्त, पिवळ्या रंगाच्या व चिकट जमिनी लागवडीस अयोग्य आहेत. कोकणपट्टी व डहाणू भागातील माती जांभ्या खडकापासून तयार झाली असून अशा जमिनी लागवडीस योग्य आहेत.

हवामान : चिकू हे उष्ण प्रदेशातील फळ असून दमट व उष्ण हवामान मानवते. आर्द्र हवा अधिक मानवते. सर्वसाधारण तापमान ११ डी.सें. ते ४० डी.सें. असावे. वार्षिक पर्जन्यमान साधारणत : २५ डी.सें. (८० ते १०० इंच) असावे. चिकू १०० मीटर उंचीपर्यंत येऊ शकतो. परंतु शक्यतो ५० मीटर उंचीपर्यंत उत्तमरित्या वाढ होते.

लागवड: बियांपासून कलमांपासून लागवड केली जाते. नवीन लागवड १५' x १५ ' किंवा १८ ' x १८' मीटर अंतरावर १ x १ x १ मीटर आकाराचा खड्डा घेऊन त्यामध्ये ५० ते १०० किलो शेणखत व अर्धे घमेले कोंबडी खत किंवा प्रेसमड केक (उसाची सुकलेली मळी) आणि १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत टाकावे.

कोकण भागामध्ये जांभ्या खडकापासून जमीन तयार झाली असल्याने पोटॅश कमी असल्यामुळे पोटॅश देणे हितावह आहे. पोटॅश (पालाश) म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश अशा पोटॅशयुक्त खतातून द्यावा. कारण दर्जा व गोडीसाठी पोटॅश आवश्यक आहे. प्रेसमड केक, कोंबडी खत हे उष्ण खत असल्यामुळे आवश्यक आहे. कारण चिकू हे हळू व कमी वाढणारे फळपीक आहे. त्यामुळे जोमदार वाढीसाठी याची आवश्यकता भासते. तसेच बहार धरताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम व न्युट्राटोन वापरल्यामुळे फळधारणेचे प्रमाण वाढते. गुणवत्ता व दर्जा सुधारण्यास मदत होते.

कलमे : गुटी कलम सर्वात फायदेशीर व व्यवहारीकदृष्ट्या चांगली पद्धत आहे. परंतु गुटीकलमामध्ये जगण्याचे प्रमाण कमी असून मुळे खोलवर जात नाहीत. कलमे करताना जर्मिनेटचा वापर केल्यास कलम चांगले तयार होऊन जारवा वाढतो असा अनुभव आहे. जगण्याचे प्रमाण वाढते.

गुटी कलमास पावसाळी हंगाम लागवडीस योग्य असून जास्त आर्द्रता असल्यास मुळे लवकर व चांगली फुटतात. एक ते दोन वर्षाची झाडे कलमासाठी वापरतात. ४५ ते ६० सेंमी पेन्सिलच्या आकाराच्या जाडीची २.५ ते ३ सेंमी अंतरावर रिंग (गोलाकार साल काढून टाकणे) घ्यावी. आजुबाजूची पाने काढून टाकावीत. अंदाजे ३ महिन्यापर्यंत मुळच्या कलम केलेल्या फांदीच्या वरील भागातून पाने फुटतात. कलमे लगेचच झाडापासून वेगळी करू नयेत. जेव्हा मुळे संपूर्णपणे वाढतील तेव्हा व्ही (V ) आकाराची खाच कलम केलेल्या फांदीला १० -१५ सेंमी भागाच्या खाली घ्यावी आणि १५ दिवस बुडवून ठेवावी व शेवटी सहा आठवड्यानंतर पहिला छेद घेतलेल्या तारखेपासून लावावी. नवीन लागवड सुरूवातीस सांगितल्याप्रमाणे करावी.

कलमे तयार करताना येणाऱ्या अडचणी :

खिरणीच्या खुंटाचे कलम सर्वात उत्तम आहे. परंतु फळांच्या आकारमानात बदल होतो. काही हळू वाढतात. आंध्रमधील खिरणीचे खुंटाच्या पेरामधील लांबी कमी असते व खिरणीच्या खुंटासाठी जी भांडी वापरली जातात. ती छिद्रयुक्त नसतात. त्यामुळे कलमाचे यशाचे प्रमाण कमी मिळते. क्षारयुक्त पाण्याचा वापर झाल्यास खिरणीची पाने जळतात. मुळातच खिरणीचे झाड हे हळू वाढणारे आहे. पश्चिम बंगालमधील हवामान खिरणीस अनुकूल असल्याने पेरांची लांबी जास्त असते व त्यामुळे त्यांची कलमे अधिक यशस्वी होतात. खिरणीच्या खुंटाची वाढ हळू असते. लवकर वाढ होण्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ४० मिली + राईपनर , न्युट्राटोन प्रत्येकी २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + हार्मोनी १५ मिली + १० लि. पाणी या प्रमाणात घेऊन तीन ते चार फवारण्या केल्यास खिरणीची फुट चांगली निघून, पाने सशक्त होतात. तसेच थंडीची परिणाम होत नाही.

जाती :

) काली पत्ती : या जातीच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची रुंद असतात. ही जात दमट हवामानातील प्रदेशात लागवडीसाठी उत्तम आहे. झाड पसरट वाढते. फळे गोल अंडाकृती, मोठी भरपूर गरयुक्त असतात. त्यात दोन ते चार बिया असतात. साल पातळ व फळातील गर गोड असतो.

२) पिली पत्ती : या जातीच्या झाडांची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. त्यामुळे उत्पन्न मर्यादित असते. फळाचे गुणधर्म काली पत्ती प्रमाणे असतात.

३) क्रिकेट बॉल : या जातीपासून मोठी गोलाकार फळे मिळतात. गर कणीदार असतो. मात्र फळे गोडीला कमी असतात.

४) छत्री : या जातीच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते. पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. फळांचा आकार कालीपत्ती जातीच्या फळाप्रमाणेच असतो. मात्र गोडी कमी असते.

खते : झाडाच्या जोमदार वाढीसाठी वर्षातून २ वेळा कल्पतरू सेंद्रिय खत झाडाच्या आळ्यात गोलाकार रिंग पद्धतीने द्यावे. पहिले १ ते ३ वर्षे वयाच्या झाडास जून - जुलैमध्ये ५०० ग्रॅम आणि ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये २५० ग्रॅम कल्पतरू खत द्यावे. ३ वर्षानंतर दरवर्षी झाडाच्या वाढीनुसार दोन्ही वेळच्या डोसमध्ये १०० ते २५० ग्रॅम खत अधिक द्यावे. खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. खत देण्यापूर्वी आळ्यामधील माती हलकीशी चाळून घ्यावी.

पाणी : हिवाळ्यात व उन्हाळ्यात ६ ते १२ दिवसाचे अंतराने पाणी देतात. महाराष्ट्रामध्ये आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी कमी पडल्यास फुलगळ होते व सुमारे ४०% उत्पादनात फरक पडू शकतो.

कीड :

१) खोड पोखरणारी आळी : ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचा ताण आहे व मशागतीचा अभाव आहे. अशा ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादुर्भाव संभवतो. खोड किड्यांचे पतंग सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात अंडी घालतात. त्यातून आळ्या बाहेर पडल्यावर सालीखालील पेशीवर उपजिवीका करतात. त्यामुळे फांद्या पिवळसर निस्तेज दिसू लागतात. खोडावरील छिद्रातून बाहेर पडणाऱ्या चोथ्यावरून या किडीचे अस्तित्व समजते. खोडावरील अथवा फांद्यावरील छिद्रे केरोसीनमध्ये बुडविलेल्या कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास आळी गुदमरून मरते किंवा आळीचा नाश करण्यासाठी चाकूने साल खरडून किडीचा नाश करावा. किडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात.

२) पाने आणि कळ्या खाणारी आळी : या किडीची आळी तोंडातून स्त्रवणाऱ्या रेशीमसारख्या धाग्याचे फांदीवरील कोवळी पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार करते आणि जाळीमध्ये राहून पानांवर उपजिविका करते. तसेच कळ्यांना लहान छिद्रे पाडून आतील भाग पोखरून खाते. किडग्रस्त झाडावर ठिकठिकाणी वाळलेली पाने दिसतात.

या किडीच्या नियंत्रणासाठी आळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील आळीसह काढून त्यांचा नाश करावा.

रोग :

१) मर किंवा फळांची गळ : पावसाळ्यात बुरशीजन्य रोगाने थोड्याफार प्रमाणात फांद्या मरतात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगट फांद्या कापून त्या जागी बोडोंपेस्ट लावावी. तसेच झाडावर १ टक्का बोर्डोमिश्रणाचा फवारा द्यावा. पावसाळ्यात फळाची गळ होऊ नये म्हणून पाऊस पडण्याच्या अगोदर १% बोर्डोमिश्रण झाडावर फवारावे. त्याच काळात ८ - ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने बोर्डोमिश्रणाच्या आणखी दोन फवारण्या द्याव्यात.

२) फळकुज व पानावरील ठिपके :

यामुळे खालच्या फांद्यावरील फळे मऊ होऊन कुजतात. पानावर लहान, गोल, तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. ठिपक्यातील मध्यभाग पांढरा राखेसारखा दिसतो. यासाठी रोगट फांद्या नष्ट कराव्यात. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. तसेच १ टक्का बोर्डोमिश्रण पावसाळ्याच्या अगोदर एक व नंतर एक अशा दोन फवारण्या कराव्यात. वरील कीड व रोगांचे नियंत्रणासाठी तसेच झाडाची जोमदार वाढ आणि अधिक दर्जेदार उत्पादनासाठी पुढील फवारण्या कराव्यात.

चिकूसाठी सप्तामृत फवारण्याची वेळ व प्रमाण :

१) पहिली फवारणी : (बहार धरतेवेळी पाणी सोडताना) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रिझम ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (१५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. ते १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३५० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (७० ते ८० दिवसांनी) : थ्राईवर १.५ ते २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + राईपनर १.५ ते २ लि. + प्रोटेक्टंट १.५ किलो + न्युट्राटोन १ ते १.५ लि. + हार्मोनी ५०० मिली. + ३०० लि.पाणी.

इतर निगा : सौरजळ व धुक्यापासून संरक्षण : आंध्रमध्ये नारळाच्या झाडांची पाने झाकतात व उत्तर भागामध्ये झाडावर वाळलेले गवत तिन्ही बाजूला दक्षिण - पुर्व (आग्नेय ) बाजू सोडून (सुर्यप्रकाशासाठी ) बाकिचा भाग झाकतात. पुण्यामध्ये खिरणीचे झाड पहिली दोन वर्षे वेगाने वाढते. परंतु जेथे चुनखडीयुक्त जमीन असेल तेथे chlorosis (केवडा - पाने पिवळी पडणे) निर्माण होतो. अशावेळी थ्राईवर व क्रॉंपशाईनर सोबत हार्मोनी वापरल्यास प्रमाण कमी होते.

फलधारणा व काढणी : पहिली तीन वर्षे फळे घेऊ नयेत. फळाचे दोन हंगाम असतात. फुलांचा पहिला बहार - सप्टेंबर, नोव्हेंबर मध्ये व दुसरा बहार -जानेवारी, फेब्रुवारीत म्हणजे पहिल्या हंगामाची फळे फेब्रुवारी, मार्चमध्ये तर दुसऱ्या हंगामाची फळे मे, जूनमध्ये तयार होतात. फळांचा जो भाग सुर्यप्रकाशात आलेला आहे तेवढा भाग विटकरी (लाल नंरिंगी) होतो. तेव्हा फळ झाले आहे असे समजावे. असे फळ चविष्ट व मधुर असते. फळ चार ते पाच दिवसात पिकते. असे फळ निर्यातीसाठी चांगले असते. ज्या फळास नारिंगी रंग असेल त्या फळाची साल व गर हिरवट राहतो. गोडी व पौष्टीकता कमीअसते.

उत्पादन : दहा वर्षापर्यंत ७५० फळे, पंधरा वर्षापर्यंत १००० ते १५०० फळे व पंधरा वर्षानंतर २००० ते २५०० फळे किंवा १८ -२० टन/हेक्टरी उत्पादन निघतो.