डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने २ एकरातील उसपासून ३॥ लाख नफा, तर ५०० डाळींबापासून ५॥ ते ६ लाख मिळविण्याचा मानस

श्री. आत्माराम जिजाबा शितोळे.
मु.पो. कुसेगाव, ता. दौंड, जि. पुणे.
मोबा. ९८९०२१७१४३



२ एकरात १८७ टन ऊस

आम्ही १५ ऑगस्ट २००९ रोजी २ एकरमध्ये २६५ वाणाच्या उसाची लागवड केली होती. जमीन पुर्णत: खडकाळ आहे. लागवड ४ फुटाच्या पट्ट्यामध्ये आहे. याला शेणखत दिले होते. लागवड झाल्यानंतर २ -३ महिन्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यावेळी 'कृष विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. ऊस लागवडीचा कृषी विज्ञानचा अंक घेतला. त्यामध्ये दिल्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, राईपनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलोच्या १५० लि. पाण्यातून दीड - दीड महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या केल्या आणि जर्मिनेटर मुळावाटे एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे २ - ३ वेळा दिले. तेवढ्यावर मुळांची वाढ भरपूर झाली. पांढऱ्या रसरशीत मुळीचे पुंजके दिसत होते. फवारणीमुळे फुटवे अधिक प्रमाणात फुटले. उसाच्या उंचीत, कांड्यामध्ये वाढ झाल्याचे जाणवले. हा ऊस जानेवारी २०११ मध्ये तुटून गेला. लागवडीनंतर १७ महिन्यानंतर तोडणी झाली. २ एकरात १८७ टन उत्पादन मिळाले. आमच्या भागात हे एक नंबर उत्पादन होते. आमच्या शेताच्या शेजारी दत्त मंदीर (जागृत देवस्थान) असल्यामुळे दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी होते. तर जाणकार शेतकरी यावेळी देवदर्शन झाल्यानंतर आवर्जुन उसाच्या प्लॉटला भेट देत असत आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेत होते.

याच उसाचा खोडवा घेतेवेळी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे जर्मिनेटर ड्रिपवाटे एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून तोडणीनंतर ८ -१० दिवसांनी सोडले. त्यामुळे जारवा वाढून कोंब जोमाने फुटले. या उसाला कोंबडखत एकरी १ ट्रेलर आणि शेणखत थोड्या प्रमाणात टाकले. नंतर १ महिन्यांनी 'कृषी विज्ञान' मासिकात दिल्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, राईपनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलोची (शेंडे अळी व खोडकिडा Short Borer & Stem Borer) १५० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने लागणीहूनही जोमाने ऊस वाढला.

पुढे ३ महिन्याचा प्लॉट असतान पुन्हा वरीलप्रमाणेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेतली. जर्मिनेटर, थ्राईवरने उसाची वाढ जोमाने होते. राईपनरने टनेज वाढते. शिवाय रिकव्हरी अधिक मिळते. तर प्रोटेक्टंटने मावा, तुडतुड्याचा नाटनाट होऊन पावडरसारखे कोटींग तयार होते.

११ व्या महिन्यात खोडव्याचा उतार ७५ टन, रिकव्हरी १०.५%

खोडवा ऊस डिसेंबर २०११ मध्ये ११ व्या महिन्यात तुटला. तर १५० टन उतारा मिळाला. एवढ्या लवकर तुटलेल्या २६५ वाणाला रिकव्हरी मिळत नाही असे म्हणतात. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ११ व्या महिन्यातील उसाला १०.५ % रिकव्हरी मिळाली.

जर्मिनेटरमुळे पांढऱ्या मुळ्यांना माप नाही

जर्मिनेटर आम्ही सर्वच पिकांना वापरतो. मक्याच्या मुळ्यांना सोडले तर मुळ्यांचा जारवा एवढा वाढतो की, त्याला माप नाही. पांढऱ्या मुळ्यांचे पुंजकेच - पुंजके दिसतात.

कीड - रोगग्रस्त डाळींब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन १५ हजार

भगवा डाळींबाची ५०० झाडे लावलेली आहेत. बागेची छाटणी केली होती. कळी निघाली पण पहिलेच वर्ष असल्याने काढून टाकली. फळे धरण्याचा विचार नव्हताच. पण जेवढी राहिली तेवढी तशीच ठेवली तर त्याला रोग किडीचा प्रादुर्भाव झाला. म्हणून मधूनच डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले. त्यावेळी घरचे म्हणत, "विनाकारण खर्च करू नका ? कशाला फवारणी करता ? " मात्र मी त्यांचे ऐकले नाही. कारण पुस्तके (कृषी विज्ञान व डाळींब) वाचून माझी खात्री होती. म्हणून २० - २२ हजाराचे डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेऊन २ फवारण्या मधुनच केल्या. तर त्यापासून ९५ हजार रू. चे डाळींब विकले. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा अनुभव इतर पिकांना मिळाला होताच आणि डाळींबाच्या या रिझल्टमुळे तो आणखी दृढ झाला. म्हणून आता सर्व पिकांना हे तंत्रज्ञान वापरणार आहे. म्हणून चालूवर्षी बहार धरण्यासाठी सरांचा सल्ला घेण्यासाठी आज (५ फेब्रुवारी २०१२) सकाळी पुणे ऑफिसला आलो आहे.

सरांच्या सल्ल्याप्रमाणे ऊस व डाळींबासाठी सप्तामृत व कल्पतरू १८,००० रू. चे आज घेऊन जात आहे.

पट्टा पद्धत व ठिबकमुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. तण दिसताच लगेच खुरपणी करतो. एकूण ५ एकर क्षेत्र मी आणि माझी पत्नी सौ. सुलोचना (जि.प.सदस्या) आम्ही दोघेच पाहतो. मजुर लावत नाही. तर आम्हाला उसापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने खर्च वजा जाता ३॥ लाख म्हणजे महिना ३० हजार रू. उत्पन्न मिळाले आहे. आता डाळींबास सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून ५०० झाडांपासून वर्षाला ५ ॥ - ६ लाख रू. उत्पन्न मिळविणार आहे. म्हणजे महिना ५० हजार रू. उत्पन्न पडणार आहे. म्हणजे स्वत: शेती केली व तंत्रज्ञान योग्य वेळेवर व प्रमाणात वापरले तर शेती खरोखरी परवडते हे आम्ही जोडप्याने दाखवून दिले आहे.