डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापराने ४ किलो द्राक्षापासून १०५० ते १२५० ग्रॅम बेदाणा

श्री. संतोष धोंडीराम जाधव,
मु. पो. दहीवडी, ता. तासगाव, जि. सांगली


द्राक्षाची जात: थॉमसन,

बागेचे क्षेत्र : २ एकर,

लागवडीतील अंतर : ६' x ५',

फळछाटणीची तारीख : ०७/१०/२०११,

पाण्याची सोय : ड्रीप,

बागेचे वय : ५ वर्षे

आम्ही आमच्या जुन्या बागेसाठी सात ते आठ वर्षापासून तसेच ५ वर्षापसून चालू बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सातत्याने करीत आहे. ही टेक्नॉंलॉजी वापरण्याअगोदर आम्ही बेदाणा बनवत होतो. परंतु आम्हाला बेदाणा उतारा ४ किलो द्राक्षात ८०० ते ९०० ग्रॅम या दरम्यान मिळत होता व बेदाणाही चांगल्या प्रतिचा बनत नव्हता. त्यामुळे दर इतरांच्या बेदाण्यापेक्षा १० % कमी मिळत होता.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरापासून मात्र आमच्या बागेवर रोगाचे प्रमाण अतिशय कमी येऊ लागले. बागा निरोगी व तजेलदार दिसू लागल्या. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानातसुद्धा द्राक्षबाग रोगमुक्त राहत असून द्राक्षे उत्पादन एका झाडापासून १६ ते १८ किलो चांगल्या क्वॉलिटीचा माल सातत्याने निघत आहे. आम्ही त्यापासून सर्व नंबर 'वन' चा बेदाणा बनवीत आहे.

बेदाणा मार्केटला दुसऱ्यांच्यापेक्षा १० ते २०% जास्त दराने विकला जातो.

बेदाणा खरेदी करणारे दलाल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केलेल्या मालाची प्रथम मागणी करतात. कारण आमचा बेदाणा गरबाज असून कलर अतिशय चांगला आहे. तसेच अतिशय चकाकी असणारा, सुरकुत्या कमी असणारा, वजनदार, देखणा बनत असून एका झाडावर ४ ते ४॥ पेटी माल घेऊन सुद्धा मालाची क्वॉलीटी उत्तम राहते. या टेक्नॉंलॉजीचा फायदा म्हणजे बेदाण्याच्या उत्पादनामध्ये ४ किलो द्राक्षापासून १०५० ग्रॅम ते १२५० ग्रॅम एवढा उतारा मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी न वापरणाऱ्या शेतकऱ्यांना ८०० ते ९०० ग्रॅम एवढाच उतारा मिळतो. द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी. ही टेक्नॉंलॉजी द्राक्ष बागायतदारांना अतिशय उपयुक्त असून द्राक्ष बागायतदरांची यातून समृद्धी निश्चितच होते आम्हाला अनुभव आला.