कोबी वजनदार, एकरी ८० हजार

श्री. विश्वनाथ साहेबराव ढोबळे,
मु. पो. धारकल्याण, ता. जि. जालना.
मोबा. ९९२३०३६४९४


मी माझ्या शेतामध्ये पत्ता कोबीचे पिक नेहमी घेतो. आताही लावले आहे. पण दरवर्षी मी पत्ता कोबीचा गड्डा १ ते १।। किलोचाच विक्रीय मिळत होता. त्यामुळे एकूण उत्पादन कमी मिळत होते. याला खर्चही भरपूर होत होता. यावर्षी मात्र मी माझ्या शेतातील पत्ता कोबीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. दरवर्षीप्रमाणे एकरी ५ ते ६ हजार खर्च केला. यावर्षी कल्पतरू सेंद्रिय खत एकरी ३ बॅगा दिले. तसेच सप्तामृत औषधांच्या २ फवारण्या केल्या तर यावर्षी माझ्या शेतात पत्ता कोबीचे गड्डे २॥ ते ३ किलो वजनाचे मिळाले. दरवर्षी रासायनिक खत वापरून खर्चही वाढत होता. मात्र उत्पन्न पाहिजे तसे मिळत नव्हते, शिवाय रासायनिक खताने जमिनीची सुपिकता कमी झाली आहे. यावर्षी कल्पतरू सेंद्रिय खतामुळे आणि डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पत्ता कोबीपासून एकरी ८० हजार रुपये मिळाले.