१ एकर मिरचीपासून ९० ते ९५ हजार रू. उत्पन्न

श्री. आण्णाराव विठ्ठलराव कर्णे,
मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बीदर - ५८५३२६(कर्नाटक)


माझ्याकडे मौजे बावलगाव येथे ४० एकर जमिन सर्व प्रकारची आहे. त्यामध्ये गेली १० वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरात असून खात्रीशीर उत्पादन घेत आहे. आम्ही फेब्रवारी २०११ मध्ये १ एकरमध्ये २ x २ फुटावर पुसा ज्वाला मिरचीची लागवड केली होती. या मिरचीची रोपे सुरूवातीला जर्मिनेटर द्रावणात (१० लि. पाण्यामध्ये २५० मिली जर्मिनेटर या प्रमाणे) बुडवून लागवड केली. तर रोपे लगेचच स्थिरावून मर अजिबात झाली नाही. पांढर्‍या मुळींचा जारवा वाढलेला दिसला. या मिरचीला कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलोच्या २ बॅगा आणि शेणखत लागवडीपुर्वी दिले होते. लागवडीनंतर २० दिवसांनी सप्तामृत प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. तेवढ्यावर मिरचीचा फुटवा व वाढ दिसून आली. त्यानंतर याचप्रमाणे २ फवारण्या २० - २० दिवसाला घेतल्या तर ६५ दिवसात हिरव्या मिरचीचे तोडे चालू झाले. या नियमित फवारण्यामुळे सुरूवातीपासूनच प्लॉटवर कुठल्याही रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. फुलकळी व बहर अधिक होता. मिरचीचे तोडे सुरू झाल्यानंतर पुन्हा १० - १५ दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या. एवढ्यावर १॥ महिना मिरचीचे तोडे चालू होते. साधारण २ टनाहून अधिक माल (हिरवी मिरची) मिळाला. त्याचे ३५ ते ४०हजार रू झाले. त्यानंतर लाल मिरच्या केल्या. त्या वळवून विकल्या, तर तिला ७५ रू. किलो भाव मिळाला. त्याचे ६० हजार असे १ एकरातून या मिरचीपासून ९० ते ९५ हजार रू. मिळाले. या मिरचीचा एकूण खर्च २० हजार रू. आला. या अनुभवावरून इतर भाजीपाला पिकांनादेखील डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे.