१० गुंठे मेथी - ५००० गड्डी, २२ दिवसांत २५ हजार

श्री. महादेव निवृत्ती चौगुले,
मु. पो. कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
मोबा.९९२१६११७२६


गेल्यावर्षी २ वर्षापासून आमच्या शेतामध्ये डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. २८ डिसेंबर २०१२ रोजी १० गुंठ्याने ३ प्लॉट करून त्यामध्ये जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून (जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात ६ ते ७ तास मेथीचे बी भिजवून ४ तास सावलीत सुकवून) टप्प्याटप्प्याने फोकले. तर तिसऱ्या दिवशी उगवण सुरू झाली. नंतर आठवड्याच्या अंतराने २ वेळा तिन्ही प्लॉटला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५० मिली १५ लि. पाण्यासाठी घेऊन फवारण्या केल्या असता. मेथीची वाढ झपाट्याने होऊन पाने हिरवीगार, रुंद तयार झाली. विशेष म्हणजे अवध्या २२ दिवसामध्ये मेथी काढणीस आली.

मेथीची गड्डी आकर्षक असल्यामुळे ५ ते ७ रू. भाव मिळाला. २०० गड्डी रोज काढून हातविक्री केली. मुठीएवढ्या १७०० गड्ड्या एका प्लॉटमधून निघाल्या. असे तिन्ही प्लॉटमधून म्हणजे १० गुंठ्यातून ५००० गड्डीचे सरासरी ५ रू. प्रमाणे महिन्याभरात २५ हजार रू. झाले. मेथी स्थानिक मार्केटला कोतोली, पन्हाळा, फळे येथे विकली.

पुर्वी आम्ही ऊस करायचो. त्याला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी शिवाय दिड वर्षे (१५ ते १८ महिने) पीक संभाळावे लागते. त्यापेक्षा डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने कमी कालावधीची पिके घेऊन चांगले उत्पन्न मिळवित आहे.