डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रोगट काकडी सुधारून ३० ते ४० रू. किलो भाव

श्री. युवराज जयराम बाऱ्हे,
मु. पो. बोरवठ, ता. पेठ, जि. नाशिक - ४२२२०८


आम्ही गेल्या ३ - ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत (जर्मिनेट, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम,न्युट्राटोन) व हार्मोनीचा वापर वांगी, काकडी, ढोबळी मिरची या पिकांवर करत आहे. या औषधांमुळे प्रतिकुल हव्मानात ही पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादन चांगले मिळते. तसेच रोग किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहते.

३ वर्षापुर्वी काकडीला जबरदस्त रिझल्ट मिळाला होता. आम्ही मे महिन्यात १० गुंठ्यामध्ये काकडी लावली होती. त्या काकडीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची फवारणी नियमित घेत होतो. त्यामुळे काकडीचे ४० दिवसातच तोडे चालू झाले. २- ३ तोडे झाल्यानंतर प्रतिकूल हवामान असताना सप्तामृत फवारणीस उशीर झाला. तर त्याचा परिणाम वेलीच्या शेंड्यावर झाला. वेल शेंड्याकडे पिवळसर होऊन सुकू लागले. प्लॉट पुर्ण वाया जातो असे वाटत होते. तेव्हा लगेचच सप्तामृताची फवारणी १०० लि. पाण्यासाठी प्रत्येकी ५०० मिली प्रमाणे घेतली असता पिवळेपणा थांबून शेंडा वाढ सुरू झाली. फुलकळीही जोरात निघू लागली. पुन्हा माल लागण्यास सुरुवात झाली. म्हणून लगेच दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ३०० मिली १०० लि. पाण्यातून केली. आम्ही तोडे २- ३ दिवसआड करत होते. तोड्याला ६० ते ९० किलो माल निघत होता. ३०० ते ४०० रू. भाव १० किलोस नाशिक मार्केटला मिळत होता. काकडीचा दर्जाही चांगला होता. भाव ज्यादा मिळाल्यामुळे आम्हाला या काकडीपासून नेहमीपेक्षा ज्याद फायदा झाला. या अनुभवावरून आम्ही आता वांग्याची लागवड केली आहे. त्याला सुद्धा डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे.