३ महिन्यात १ एकर बटाट्यापासून ५० हजार निव्वळ नफा

श्री. धोंडीभाऊ विष्णूजी नाईकरे, दत्तनिवास, कमान (चास), ता. खेड, जि. पुणे. मोबा. ९४२०१६१२७७

बटाटा पिकासाठी १ एकर शेती ट्रॅक्टरने पुर्णपणे नांगरली. नंतर ट्रॅक्टरने फणणी करून शेणखत ५ ट्रॉली व कोंबडखत २ ट्रॉली एकत्र शेतात मिसळले. नंतर खत मिक्स होण्यासाठी ट्रॅक्टरने फणणी करून पाणी दिले. जमीन वाफश्यावर आल्यावर लाकडी नांगराने १।। फुटाची सारी काढून ३५० किलो पुकराज बेण्यास जर्मिनेटरची प्रक्रिया करून मजुरांकडून लागवड २० नोव्हेंबर २०१३ रोजी केली. बेणे २५०० रू./क्विंटल दराने मंचरवरून श्री. मोरे यांच्याकडून आणले होते.

लागवडीनंतर बटाट्यास १०:२६:२६ व निंबोळी पेंड एकत्र करून सरीत टाकले आणि नांगरीने सरी फोडली त्यानंतर बटाटा पीक ७ ते १० दिवसाचे असताना त्याच सरीतून नांगर फिरवला. त्यानंतर पुन्हा २५ ते ३५ दिवसांनी दुसऱ्यांदा सरीतून नांगर फिरवला. त्यामुळे तण निघते. खुरपणीचा खर्च वाचतो. नंतर युरिया + झिंक व काळे पोटॅश दिले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची ३० ते ३५ दिवसांनी पहिली फवारणी केली. त्यामुळे पाने पिवळी झालेली एकदम हिरवीगार झाली. फुटवा व वाढ उत्कृष्ट झाली. नंतर दुसरी फवारणी ५० दिवसांनी बटाटे लिंबाएवढे असताना केली आणि ६० ते ७० दिवसाचे पीक १०० ते १५० ग्रॅम वजनाचे बटाटे असताना तिसरी फवारणी केली. त्यामुळे बटाट्याची फुगवण, वजन वाढून कलर (चकाकी) आल्याचे दिसले. या तंत्रज्ञानाने फुगवण एवढी होते की, जमीन उकलते आणि ९० दिवसांनी बटाटा काढणीस येतो.

बटाट्यास एकरी खर्च -१० कट्टे बेणे २५ हजार, शेणखत ५ ट्रॉली १५ हजार, कोंबडखत २ ट्रॉली ७ हजार, ट्रॅक्टर मशागत २ हजार, सप्तामृत फवारणी ४ हजार, आंतरमशागत १.५ हजार, लागवड व काढणी मजुरी २ हजार असा सर्वसाधारण एकरी ५० -५५ हजार रू. खर्च येतो आणि उत्पन्न ७ ते ८ टन मिळून सरासरी १२ ते १५ रू./किलो भाव मिळाला असता. एकरी १ लाखाच्या पुढे उत्पन्न मिळते. असे ३ महिन्यात एकरातून खर्च वजा जाता ५० हजार रू. मिळतात.

Related New Articles
more...