डांगर भोपळ्याने माझे नशिबाचा भोपळा फोडून दिले भरघोस उत्पादन !

श्री. दादासाहेब सुग्रीव काळे,
मु. पो. कातेवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर,
मोबा. ९७६७२०४०९१


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'कृषी विज्ञान' मासिकाचा जुना वाचक व सभासद असून त्यातील वेगवेगळ्या पिकांविषयीचे शेतकऱ्यांचे अनुभव वाचून प्रभावीत होऊन एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ऑफिसला भेट दिली व तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रथम डांगर भोपळ्यावरती या तंत्रज्ञाना चा वापर सुरू केला. कातेवाडी येथे माझी जमीन असून यापैकी १ एकर हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीत महिको कंपनीचा डांगर भोपळा २९ ऑक्टोबर २०१३ रोजी ५ x ३ फुटावर लावला. याच्या मागील वर्षीदेखील डांगर भोपळा लावला होता. त्यावेळी भोपळ्यासाठी वातावरण अनुकूल होते. त्यामुळे ६० - ७५ दिवसात भोपळा मार्केटला आल होता. यावर्षी माल मार्केटला येण्यास उशीर झाला. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्याने उत्पादन अधिक येवून भाव चांगला मिळाला.

भोपळ्याला सप्तामृताच्या १५ दिवसाच्या अंतराने ४ फवारण्या केल्या. फवारणीचा ३ - ४ थ्या दिवशी रिझल्ट मिळत होता. फवारणीनंतर पानांची साईज वाढली. वेलीची जोमाने वाढ होण्यास मदत झाली. पानगळ व फुलगळ होत होती ती पुर्णपणे थांबली. फवारणीनंतर वेलीवर व पानांवर काळोखी दिसून प्लॉट पहिल्यापेक्षा हिरवागार दिसू लागला. पुढे फळ पोसण्यासाठी केलेल्या फवारणीने फळे लवकर पोसली. सांगितल्याप्रमाणे मधे जर्मिनेटर एकरी १ लि. चे पाटाने ड्रेंचिंग केले. त्यामुळे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढला. ५ x ३ फुट अंतर वेलीने पूर्ण झाकून गेले. भोपळ्याच्या वजनात व साईजमध्ये चांगली वाढ झाली. यावर्षी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने भोपळ्याचे वजन १८ ते २० किलो भरत होते. मागील वर्षी तंत्रज्ञान न वापरता फळे ८ ते १० किलो वजनाची मिळाली होती. आज ८ टन माल गुलटेकडी मार्केटला आणला आहे. यावर्षी १५ ते १६ टन एकरी उत्पादन काढण्यास मी यशस्वी झालो. मागीलवर्षी फक्त १० टन उत्पादन मिळाले होते. यावेळीस मार्केटला भाव नसताना देखील ८ ते १० रू./किलो भावाने मालाची विक्री झाली. इतरांचा भोपळा ३ - ४ रू./किलोने कसाबसा जात आहे. यावर्षी हवामान खराब असल्यामुळे माझ्याच भावाच्या ४ एकर डांगर भोपळ्याच्या प्लॉटवर मावा, तुडतुडे, व्हायरस आल्याने इतर औषधांच्या फवारण्या करूनदेखील भोपळा दुरुस्त न झाल्याने शेवटी तो उपटून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही. भोपळा उपटताना वेलीला मुळकूज झाल्याचेही जाणवले. आम्हाला मात्र या खराब वातावरणातदेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने नुसते वाचवले नाही तर दर्जेदार उत्पदान व बाजारभावही अधिक मिळवून दिले.