पूर्ण पिंगट लाल फरदड टवटवीत होऊन फुल, पात्या, बोंडे भरपूर

श्री. राजाराम पन्नालाल राठोड, मु. सुभाषवाडी, पो. धोबीवराड, ता. जि. जळगाव.
मोबा. ९७६४०३३९०९


आमच्याकडे ३५ -४० एकर जमीन आहे. त्यातील २५ एकरमध्ये गेल्यावर्षी कापूस होता. यातील ७ एकरमध्ये ब्रम्हा आणि ५ एकरमध्ये राशी कापूस होता. जमीन भारी काळी आहे. लागवड ५' x २' वर आहे. याचा पहिला वेचा दिवाळीत पूर्ण झाला. ७ एकरमध्ये ६० ते ६५ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यानंतर याची फरदड घेतली. साधारण लागवडीपासून १५० दिवसांचा प्लॉट असताना फूट झाली होती. मात्र याच अवस्थेत डिसेंबर महिन्यात खराब हवामानाने पानांना पिंगटपणा येऊन पूर्ण कापूस लाल पडून गेली. यावर वेगवेगळी बुरशीनाशके फवारली तरी फरक पडेना. काहीतरी अन्नघटक कमी पडत असेल असे वाटले म्हणून सुक्ष्म अन्नद्रव्ये सोडली, तरीही रोग आटोक्यात येईना. या काळात किसान प्रदर्शन पुणे येथे पाहण्यास आलो होतो. तेव्हा प्रदर्शन पाहताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवरून तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तेथे कापसाची वरील परिस्थिती सांगितल्यावर तज्ज्ञांनी कॉटनथ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर व हार्मोनी दिले. घरी आल्यानंतर त्याची फवारणी केली. तर चौथ्या दिवशी पिंगट - लाल पाने हिरवीगार होऊ लागली. फुलपातीतून कैरीत रूपांतर झाले. ही फरदड पूर्ण हातून गेली होती, आता काहीच उत्पादन मिळणार नाही अशी अवस्था असताना सध्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने झाडांवर ७० - ८० मोठ्या कैऱ्या लागून फुलपात्या सुरूच आहेत. या पीक परिस्थतीवरून लागणीच्या कापसाएवढेच उत्पादन मिळेल असे वाटते.

ही कपाशी सुधारल्यावर दुसऱ्या ५ एकर क्षेत्रातील फरदडची बोंडे पोसण्यासाठी कॉटनथ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर फवारले. तर त्या प्लॉटमध्येदेखील अमुलाग्र बदल जाणवतो आहे. लागवडीच्या उत्पादनातील ओला कापूस ३० - ३४ क्विंटल दिवाळीत विकला. तेव्हा ४६०० रू./ क्विंटल भाव मिळाला. बाकीचा साठवला आहे. १५० -१५५ क्विंटल कापूस अजून आहे तो सध्या ५२०० ते ५३०० रू. भाव झाल्याने विकणार आहे. सध्या भावही चांगले आहेत आणि पुढे फरदडचे उत्पादन निघेल. त्यासाठी पहिला कापूस विकणार आहे.

सध्या ५ फेब्रुवारीला पपईची १२५० रोपे लावली आहेत. पुन्हा मार्च - एप्रिलमध्ये २।। ते ३ एकर पपई लावणार आहे. आमच्याकडे मार्च - एप्रिलमध्येच पपई लावली जाते. फेब्रुवारीमधील पपई सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये चालू होते. हिला ८ ते ९ रू./किलो भाव मिळतो मात्र या पपई जुलै - ऑगस्टमध्ये व्हायरस येतो. म्हणून लोक मार्च - एप्रिलमध्ये लावतात आणि ती जेव्हा मार्केटला येते तेव्हा भाव ढासळतात. ती नोव्हेंबरमध्ये चालू होते. त्यावेळेस भाव ४ - ५ रू./किलो होतात. पुढे डिसेंबरमध्ये तर २ - ३ रू./किलो एवढे खाली येतात. म्हणून फेब्रुवारीची लागवड केली आहे. तिला जर्मिनेटरचे आठव्या दिवशी ड्रेंचिंग करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे नियमित घेणार आहे. यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. आपल्या तंत्रज्ञानाने ही पपई व्हायरसमुक्त राहील अशी आशा आहे.