१ हजार लिंबू झाडांपासून १० लाख

श्री. धनंजय दत्तात्रय ढवळे,
मु. पो. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर.
मोबा. ९४२३१६४१६४


लिंबाला डिसेंबरमध्ये ताण दिला होता. एक हजार झाडे आहेत. फुटव्यासाठी जानेवारीमध्ये २०० लि. पाण्याला प्रत्येकी १ लि. जर्मिनेटर, थ्राईवर ची फवारणी केली असता फुटवा भरपूर झाला. आठवड्यातून २ वेळा तोडतो. आठवड्याला १०० डाग (१५ किलोचे) निघतात. ८० ते १०० ग्रॅमचे साधारण फळ निघते. एका किलोत फक्त १० ते १२ फळे बसतात. वर्षभर फुल येते. फुल चालूच असते. हस्तबहाराला शेणखत ४ पाट्या आणि १५:१५:१५ हे १ किलो./झाडाला दिले.

१५ किलोची गोणी ६०० रू.ला

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ३ -४ वर्षापासून वापरतो. मागील मुलाखत 'संत्रा, मोसंबी, लिंबू लागवड' पुस्तकामध्ये पान नं. ७० वर प्रसारीत झाली आहे. त्यावेळी आमची फळे २ नंबरची (लहान) असूनही १ नंबर भावाने विक्री झाली. डॉ.बावसकर तंत्रज्ञान साधारण डिसेंबर - जानेवारीमध्ये एकदा आणि जुनमध्ये एकदा फवारतो. फळ लिंबोळी आकाराचे असताना राईपनर फवारतो. त्यामुळे माल लवकर फुगतो. क्रॉपशाईनरने आठवड्यात शाईनिंग येते. प्रोटेक्टंटमुळे फुले चांगली येतात. या तंत्रज्ञानाने झाडावर पानोपान फुल लागते. गावरान लिंबू आहे. रोपे बाहेरून शेतकऱ्याकडून आणली होती. आजचा माल ४० रू./किलो भावाने गेला. १५ किलोच्या गोणीला ६०० रू. भाव मिळाला. फळांची काढणी करताना ७ - ८ फुटाच्या बांबूला पुढे आकडी लावून फळे खाली पडून नंतर वेचतो वर्षाला एक झाड १ हजार रू. देते. १ हजार झाडांपासून १० लाख रू. होतात.

आमच्या भागात पाणी कमी आहे. मी शेततळे केले आहे. लिंबू वर्षभर चालू असते. थंडीत १५० ते २०० रू. गोणीला भाव मिळतो. उन्हाळ्यात ४०० ते ६०० रू. भाव मिळतो. तर जास्तीचा भाव ८०० ते ९०० रू./गोणीस मिळतो. आमचा १५० शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. आज (७ फेब्रुवारी २०१४) ४ टन माल आणला होता. पावसाळ्यात यापेक्षा दुप्पट माल निघतो. आमच्या ग्रुपमध्ये मीच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. आपल्याला चांगला अनुभव आला आहे. इतरांना सांगितले तरी त्यांच्या डोक्यात बसत नाही. काहीजण आता तंत्रज्ञाना बद्दल विचारू लागलेत. आज फुटीसाठी जर्मिनेटर, प्रिझम व फळे पोसण्यासाठी राईपनर घेऊन जात आहे.