उसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर आंतरपीक झेंडूपासून सर्व खर्च निघून ऊस पीक बोनस'!

श्री. अजय सदाशिव माळी,
मु. पो. पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
मोबा. ९७६३२४४४६९


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रथमच वापरत आहे. चालूवर्षी १ डिसेंबर २०१२ रोजी १ एकर ऊस लागण (८६०३२) केली. ३ फुटाच्या सरीवर १ -१ फुट अंतरावर लागण आहे. लागवडीच्यावेळी आमच्या भागात थंडीचे प्रमाण फार होते. त्यातच अतिरिक्त जादा पाणी झाले होते. त्यामुळे लागणीनंतर १२ ते १५ दिवस झाले तरी उसाचे कोंब दिसत नव्हते. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कोल्हापूर शाखेचे प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर ८० मिली + बाविस्टीन ३० ग्रॅम १५ लि. च्या पंपात घेऊन आळवणी केली तर ४ ते ५ दिवसात सर्वच्या सर्व कोंब फुटल्याने आढळले.

त्यानंतर १ महिन्याने आम्ही मोरेंच्या सल्ल्याने थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी केली, तर फुटवा भरपूर होऊन उसाला तेज आले. ५ फेब्रुवारीपर्यंत ऊस १।। ते २ फुट उंचीचा झालेला आहे. आमच्या अगोदर लागण झालेल्यांचा ऊस १ ते १।। फुटच आहे. त्यामुळे लोक आम्हाला विचारतात. तुम्ही नक्की काय वापरले उसाला ? आतापर्यंत अनेकांनी उसाच्या प्लॉटला भेटी दिल्या आहेत. फवारण्यादेखील करणार आहे आणि जर्मिनेटरचे अजून २-३ वेळा ड्रेंचिंग करणार आहे.

या उसामध्येच कलकत्ता झेंडू लावलेला आहे. त्याला देखील २ फवारण्या आतापर्यंत केल्या आहेत .तर २ - ३ दिवसांच्या अंतराने ७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत ६ तोडे झाले आहेत. तोड्याला ३० ते ३५ किलो माल निघत आहे. लोकल मार्केट मध्ये सुरुवातीला १५ रू. किलो भाव मिळाला. त्यानंतर भाव वाढून सध्या ३० ते ३५ रू. किलो भाव मिळत आहे. अजून महिनाभर तरी उत्पादन चालू राहील. या झेंडूपासून उसाचा सर्व खर्च निघून उसाचे उत्पादन बोनसमध्ये मिळेल.

या पिकांबरोबर ६।। गुंठ्यामध्ये कोल्हापूरी काकडी व ५।। गुंठ्यात शिरगाव काटा ही वांगी लावली आहेत. या दोन्ही पिकांत कोथिंबीरीचे पुंजके लावले आहेत तर आतापर्यंत २।। हजार रू. ची कोथिंबीर विकून अजून २ हजार गड्डी सहज निघेल. सरासरी ५ रू. भाव मिळाला तरी कोथिंबीरीपासून १२ -१३ हजार रू. होतील काकडीला महिन्यातच फुल लागले आहे. कोथिंबीर, काकडी व वांग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या आहेत. वांग्याचाही फुटवा चांगला झाला आहे.

उसाला सुरुवातीला २०:२०:१३ चे १ पोते व कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा दिल्या आहेत. त्यानंतर १ महिन्याने युरिया २ पोती दिली आहेत. उसाला पाटाने १५ ते २० दिवसाला पाणी देत आहे.