६० अंजिराच्या झाडापासून १। लाख रुपये

श्री. चिंतामण दिनकर झेंडे,
मु.पो. झेंडेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मोबा. ९८८१८३२१२३


माझ्याकडे १४' x १४' वर मध्यम प्रतीच्या जमिनीत ५ - ६ वर्षापुर्वी लावलेली अंजीराची ६० झाडे आहेत. अंजीराला तशी १ वर्षातच फळे लागतात. मात्र आम्ही २ वर्षानंतर बहार धरण्यास सुरुवात केली. पहिले मिठा बहार ऑक्टोबर - नोव्हेंबरला पहिले पाणी देऊन धरायचो. ही फळे मार्च - एप्रिलमध्ये मार्केटला यायची. मात्र अलिकडे लवकर माल घेण्यासाठी आमच्या भागातील बहुतांशी शेतकरी खट्टा बहार घेऊ लागलेत. आम्हीदेखील २ - ३ वर्षापासून आता खट्टा बहारच घेत आहेत. यासाठी एप्रिल ते जून महिन्यात बागेला ताण बसतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी या अंजीराला गेल्या २ वर्षापासून वापरत आहे. चालूवर्षी जुलै मध्ये प्रत्येक झाडास २ किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि शेणखत १० घमेली देऊन पहिले पाणी दिले. त्यानंतर बोर्डोचा पहिला हात (स्प्रे) घेतला. नंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे दोडी निघताना ८ - १० दिवसाला २ - ३ स्प्रे घेतले. याच काळात ढगाळ वातावरण असल्याने करपा, तांबेरा येऊ नये म्हणून यासोबत रासायनिक बुरशीनाशकेदेखील फवारली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दोडी भरपूर निघाल्याचे आढळते, शिवाय एरवी शेंड्याकडील दोडी वातावरणात बदल झाला की गळते, ती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने होत नाही. इतरांच्या बागांमध्ये शेंड्यांची दोडी गळ मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दोडी सेटिंग चांगले झाल्यानंतर पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताचे २ स्प्रे घेतले. त्यानंतर मध्यम आकाराचा माल झाल्यानंतर मात्र फवारण्या करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे डिसेंबरपासून फवारण्या सर्वच शेतकरी बंद करतात.

डिसेंबरमध्ये अंजीराचे तोडे चालू झाले. दररोज ८० ते १०० किलो माल निघत आहे. काहीवेळेस इतर कामाने तोडणी शक्य न झल्यास त्यावेळी दिवसाड तोडा केला की, मालात वाढ होते. फळांना तंत्रज्ञाना ने आकर्षक कलर व चमक येत असल्येन ग्राहक मालाकडे आकर्षिले जाते. यामुळे इतरांपेक्षा भाव जादा मिळतो. सध्या (२१ फेब्रुवारी २०१५) तोडे चालू आहेत. हा माल मार्च अखेरपर्यंत चालेल. यावर्षी माल भरपूर लागल्याने मध्यम आकाराच्या फळांचे प्रमाण जादा आहे.

मोठा माल बॉक्समध्ये भरून मुंबई मार्केटला पाठवितो. एका बॉक्समध्ये ३ फळांच्या ४ ओळी अशाप्रकारे १२ फळांचा १ बॉक्स व अशा ४ बॉक्सचा १ गठ्ठा पॅकिंग करून मुंबईला पाठवितो. या ४ बॉक्सचे साधारण ३ ते ३। किलो वजन भरते. या ४ बॉक्सला (३ किलो) सध्या २०० ते २५० रू. भाव मिळत आहे. मध्यम माल करंड्यात भरून पुणे मार्केटला पाठवितो. तेथे या ११ - १२ किलोच्या करंड्यांना सध्या ४० ते ६० रू./ किलो भाव मिळत आहे आणि बारीक व उकललेला माल हा हडपसर मार्केटला नेतो. त्याला २० ते ३० रू./किलो भाव मिळतो.

गेल्यावर्षी अंजीराला भाव जादा होते. हडपसरला ३० ते ४० रू./किलो तर पुणे मार्केटला ६० त ८० रू./किलो भाव मिळत होता. मुंबई मार्केटला ४ बॉक्सला (३ ते ३। किलोस) २५० ते ३०० रू. भाव मिळत होता. त्यामुळे या ६० झाडांपासून १।। लाख रू. उत्पन्न मिळाले होते. तेव्हाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले होते. यंदा बाजार कमी आहेत. त्यामुळे लाख - सव्वालाख रू. होतील. या अंजीरास खते, औषधे यांचा एकूण खर्च ३० ते ३५ हजार रू. येतो. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत २ हजार रू. व सप्तामृताच्या ४ फवारण्या (१०० लि. द्रावणाच्या) घेतो. त्याचे ४ ते ५ हजार असे ७ हजारापर्यंत खर्च होतो. झाडांवर मात्र फळे जास्त असल्याने एका झाडापासून सरासरी एकूण १०० किलो माल निघेल असा अंदाज आहे.