बहार धरण्यावर हवामानातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या २ - ३ वर्षापासून पाऊसमान उशीरा व कमी झाल्यामुळे हवामानामध्ये बदल होत गेले. विशेष करून नवरात्रात सुरू होणारी थंडी ही डिसेंबर अखेर सुरू होऊन जानेवारीत आली आणि बऱ्याच ठिकाणी आंब्याला मोहोर जानेवारी अखेर ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघाला. यामुळे आंब्याचा काळ ४ - ५ महिन्याचा धरला तर एरवी डिसेंबरमध्ये लागलेल्या मोहोराची फळे एप्रिल - मे मध्ये येतात. परंतु डिसेंबर - जानेवारीत ज्या वेगाने थंडी पडली तिने मागील २ वर्षातील घट भरून काढली व सर्वदूर मोहोर प्रचंड प्रमाणात आला. परंतु तो उशीरा आला, त्यामुळे हा आंबा मे अखेर ते जून अखेर पदार्पण करेल. या ४ - ५ महिन्याच्या काळात वादळ, अवकाळी पाऊस, आभाळाने मोहोरगळ व गुंडीगळ होईल. याला जरी सप्तामृताची फवारणी केली तरी निसर्गावर मात करता येत नाही. फक्त याच्या प्रयोगातून १५ दिवस ते १ महिना अगोदर आंबा आणता येतो का ? हा प्रयोग करावा लागेल. कारण केळी, आंबा, द्राक्ष, डाळींब नंतर वेलवर्गीय, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला उदा. मेथी, कोथिंबीर या पिकांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मात करून पाहिजे तेव्हा माल घेवू शकतो व त्यास १५ दिवस ते ९ महिना अगोदर आणता येते, ही हजारो शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. परंतु अशा अनाकलनिय व लहरी निसर्गावर आपणास मात करता येते का ? या दृष्टीने अधिक प्रयोग करणे गरजेचे आहे.

आंब्याच्या बाबतीत काही ठिकाणी बदलत्या हवामानात मोहोर न लागता अचानक शेंड्याला पालवी आली आहे. काही ठिकाणी शेंड्याची पालवी जळाली आहे. आंब्याला मोहोर लागताना शेकडो झाडांचे जेव्हा निरिक्षण केले तेव्हा आमच्या असे लक्षात आले की, जेव्हा थंडीत सुर्य उगवल्यानंतर सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत निरभ्र सुर्यप्रकाश न राहता १२ वाजेपर्यंत आभाळ असते. त्यामुळे झाडाच्या पुर्वेकडील भागात मोहोर कमी दिसत आहे. याचे कारण मोहोरास जे अनुकूल हवामान पाहिजे ते मिळाले नाही. हीच गत सुर्य ज्यावेळेस दुपारी ३ ते ६ या काळात ज्या गोल, डेरेदार, बहीरवक्र झाडाचे भागावर पडतो तेथे मोहोर हा प्रकर्षाने आलेला दिसतो. असे निदान हापूस केशर आंब्यामध्ये आढळून आले. ही गोष्ट बदलत्या हवामानात जाणवते. सध्याच्या काळात ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश पोहचत नाही. परंतु झाडाच्या मधल्या बेचक्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मोहोर डोकावतो आहे.

डाळींबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव सर्व महाराष्ट्रभर प्रकर्षाने जाणवत असला तरी दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे गेल्या ५ - ७ वर्षापासून ग्लोबल वार्मिंगच्या तडाख्यामुळे हवामानातील मापदंडामुळे (परिमाण) यामध्ये प्रचंड बदल झाल्याने सरासरी तापमान, किमान तापमान, कमाल तापमान आणि तिन्ही - चारही हंगामातील तापमानातील विषमता आणि सकाळची ८ वाजताची आर्द्रता, दुपारी २ वाजताची आर्द्रता, रात्रीचे घटलेले तापमान आणि विदर्भ, खानदेशातील उन्हाळ्यातील व रात्रीचे तापमान, वाऱ्याची दिशा व वेग, त्यामुळे पिकावर होणारा परिणाम, याचे अनुमान आणि अंदाज काढता येत नाही. यामुळे याच्यावर ताबडतोब प्रतिबंधात्मक इलाज म्हणून काम करणे अवघड जाते. ज्यावेळेस अवकाळी पाऊस किंवा गारपीट होते, त्याठिकाणी अशा परिस्थितीची २४ तास अगोदर चाहूल लागताच ग्रीन शेडनेटचा प्रयोग करून नुकसान टळते. परंतु ज्या ठिकाणी केळी, द्राक्ष, डाळींब असो तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पहिल्यापासून वापर केल्याने नुकसान जरी झाले तरी त्यातून सावरू शकले आहेत. त्यातून बऱ्यापैकी नुकसानीनंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यानंतर पुढील हंगामात ६० - ७०% उत्पादन मिळाले असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले व यांच्या मुलाखती आम्ही वेळोवेळी 'कृषी विज्ञान' मधून प्रकशित केल्या आहेत.

केळीमध्ये विविध अवस्थेत साधारण मृगबागाची व कांदे बागची केळी ज्यावेलेस ७ - ८ महिन्याची होते त्यावेळेस या आपत्तीचा उपद्रव होतो. त्यावेळेस वाऱ्याने व पावसाने पाने फाटतात. गारपिटीने कमळ व घडांचे नुकसान होते. झाडे उन्मळून पडतात. तेव्हा केळीचे घड मोठे झाल्यानंतर त्याला खोडाला अथवा घडाच्या दांड्याला बांबूने तिरपे बांधून आधार देवून तो वादळाने पडणार नाही असे पाहावे. इथे शेडनेटचा (७५:२५ किंवा ५०:५०) जरी वापर केला तरी गारा अथवा पावसाचे पाणी छिद्रातून आत जावून पाने व घडांचे नुकसान होते. तेव्हा येथे १२ ते १५ तास अगोदर झाडाच्या वरून दणकट प्लॅस्टिकचा कागद अंथरून त्याचा उतार चारही बाजूंना जसे आठवडे बाजारात दुकानदार उन्हाच्या व पावसाच्या बचावासाठी पाल बांधतात. त्याप्रमाणे चारही बाजूला उतारा व त्यातही पश्चिम बाजूला जास्त उतार ठेवून दणकट शेततळ्याला जसा प्लॅस्टिक कागद वापरतात तसा वापरावा. असा कागद ४ - ५ वर्ष वापरता येवून त्याचा खर्च निघून जातो. यावर अनेक प्रयोग करणे गरजेचे आहेत. म्हणजे निरिक्षणे, तुलनात्मक अभ्यास करून एका टप्प्यापर्यंत निर्णय घेणे सोयीचे होईल. सर्वसाधारण शेतकऱ्यांला, अधिकाऱ्यांना, शासनाला गेल्या ५ - ६ वर्षाचा अभ्यास आपत्तीची चाहूल लागण्याची, त्यांच्या उपद्रवाची संभाव्य कल्पना लक्षात घेता त्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

संत्रा, मोसंबी, लिंबू, या फळबागांची उंची फार असल्यामुळे येथे शेडनेट सारखे प्लॅस्टिकचा कागद अंथरून यापासून कितपत बचाव होतो हे अजून प्रयोगातून कळले नाही. तेव्हा यावर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र, नागपूर व फळ संशोधन केंद, श्रीरामपूर यांनी विविध प्रयोग करणे गरजेचे आहे. विदर्भामध्ये लिंबूवर्गीय इतर पिकांमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ७ -८ जिल्ह्यात संशोधन व विकासाचे कार्य सुरू केले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये याचा तुलनात्मक अभ्यास चालू आहे. २ - ४ वर्षात याचे निष्कर्ष मिळू शकतील.

कापसामध्ये कापूस वेचणीच्या अगोदर किंवा बोंडे/कैऱ्यांच्य अवस्थेत वर दिलेल्या उपायापैकी शेडनेट किंवा प्लॅस्टिकचा वापर काही अंशी उपयुक्त ठरू शकतो, मात्र कापूस एकदा वेचणीस आल्यावर यावर उपाय अजून शक्य नाही. एकमात्र खरे जर प्रथमपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत व कॉटन थ्राईवरचा वापर केला तर खरीपाचा सिझन जो डिसेंबरपर्यंत चालतो तो कमी करून दिवाळीपर्यंत (नोव्हेंबरअखेर) कापसाच्या ३ वेचण्या पूर्ण करून खरीप हंगामाचा लाभ घेता येतो व लगेच फरदडचा प्रयोग करून मार्चअखेर फरदडचा लाभही घेता येतो. याच्या मुलाखती आम्ही वेळोवेळी कृषी विज्ञानमधून प्रकाशित केल्या आहेत. शेवग्याच्या उगवणीवर हवामानातील प्रचंड बदलामुळे अपरिमित परिणाम होतो. थंडीमध्ये शेवग्याची उगवण (बी लागण) करू नये व लागवडही करू नये. नंतर हवामानाच्या बदलामुले झाडांची वाढ खुंटते, फुले नीट लागत नाहीत, छाटणी व्यवस्थित करूनही पुले लागत नाही. कारण तापमान आवश्यकतेपेक्षा कमी असते. जर वादल आले तर ऊन व वारा जादा तसेच पाण्याचे प्रमाण कमी जास्त झाले तरी फुलगळ होते. थंडीमुळे शेंगा पोसत नाहीत. वाध्या हिरव्यऐवजी पिवळ्या होतात. देठाला व शेंड्याला वाकड्या - तिकड्या होतात. तुरखाटीसारखे व दाबणासारख्या जाडीच्या शेंगा ह्या सरळ न होता व न पोसता मध्ये वाडक्या - तिकड्या होतात आणि देठाला व शेगांच्या टोकाला सुकल्यासारख्या व तडे गेल्यासारख्या होतात. शेंगाचा रंग तांबडा ते तपकिरी होऊन पोसंत नाहीत. त्यामुळे हा माल बदला म्हणूनही उपयोगी येत नाही. तेव्हा येथे रासायनिक खताचा वापर कमी करावा व जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. तसेच कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडे पिकाचे नमुने घेवून हवामानाचे मापदंड लक्षात घेवून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. परस्पर निर्णय घेवू नये.

शेवग्यातील उन्हाळी लागवड ही उन्हाळ्यात सावलीत मार्च - एप्रिलमध्ये पिशवीमध्ये बी टोकून रोपे तयार करणे सोयीचे असते. म्हणजे येथे बऱ्यापैकी उगवण होते व ही लागवड पाण्याची उपलब्धता असली की, सप्टेंबर - ऑक्टोबर (गणपती) मध्ये फुले लागून याच्या शेंगा नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू होवून मार्चपर्यंत चांगला माल येतो त्यामुळे भाव अधिक सापडतो. त्यामुळे डिसेंबर ते मार्च या ४ महिन्यात ४० ते १२० रू. किलो भाव मिळून वर्षभराचे पैसे होतात. इतर वेळी माल कमी, उन्हाळ्यात भाव कमी त्यामुळे वर्षातील उरलेल्या भागात शेवग्याचे पैसे होत नाहीत. तेव्हा या काळात देशांतर्गत स्थानिक मार्केट न करता युरोप, आखाती राष्ट्रांत निर्यातीसाठी पाठवावे.

पालेभाज्या फळभाज्या गेल्या ५ - ७ वर्षमध्ये शेडनेट, आणि पॉलिहाऊस या तंत्रज्ञानाच्या आधारे मेथी, कोथिंबीर, पालक तसेच काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो, रंगीत ढोबळी, विविध प्रकारची फुले - कार्नेशन, अॅस्टर, गुलाब, जरबेरा ही फुळझाडे घेण्याची प्रथा सुरू झाली आहे. यातील शेतकरी हा प्रयोगशिल, कष्टाळू, जिद्दी, नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करणार असल्याने याचे रिझल्ट हे चांगले मिळतात आणि नियंत्रीत वातावरणात ही पिके घेतल्याने याचा दर्जा उत्तम मिळून याला भाव जादा मिळतो व पारंपारिकतेपेक्षा दुप्पट - तिप्पट पैसे होतात. त्यामुळे इथे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्नच सहसा उद्भवत नाही.