चंद्रपूरमध्ये माझी मिरची १ नंबर

श्री. कवडुजी नामदेवराव सोनडवले, मु.पो. गरचांदुर, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर- ४४२९०८. मोबा. ९८२२७०७८५३

चंद्रपूर जिल्ह्यातील मी एक साधा, सरळ शेतकारी आहे. आपल्यातच रुजलेला, इतरांचे अनुभव घेवून व त्यांना आपले अनुभव सांगून मी शेती करण्याचा निर्णय घेतला. तसा मी अंबुजा सिमेंटमध्ये एक छोटासा ठेकेदार आहे. तेथे मी 'झाडे लावा - झाडे जगवा' हे काम करतो, म्हणजे सांगण्याचे उद्दिष्टच असे की, मी त्या प्लॉटमध्ये गार्डन मेंटेनन्स, झाडे लावणे व झाडाचे संगोपन करणे हे काम करत आहे. त्याचबरोबर मी घरची शेती करण्यास सुरुवात केली. प्रथम शेती सपाट करून लागवडीयोग्य केली. पुर्ण शेतात ठिबक केले आहे. त्यानंतर मी २०१३ मध्ये शेणखत टाकून मल्चिंग बेड तयार करून खरबूज आणि टरबूज लावले. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर मी सुरूवातीपासून शेतावर करत आहे. त्यामुळे मी टरबुज व खरबूजाचे चांगले उत्पादन घेवू शकलो.

'कृषी विज्ञान' मासिक शेतकऱ्यांचा वाटाड्या

आता डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची पुस्तके मी स्वत: कृषी क्रांती केंद्र, नागपूर येथून मागवून घेतली. त्यांचा अभ्यास मी वेळेवर करतो. माझ्याकडे 'कृषी विज्ञान' मासिक असल्यामुळे मी वेगवेगळ्या भागातल्या मुलाखती असणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्याचबरोबर श्री. वराडे यांना होन (९८२२२६३२५९/७८७५२१३३३७) करून पिकावरील माहिती घेत असतो. आता मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मिरचीची लागवड केली आहे.

मी २ एकर मिरची डॉ.बावसकर तंत्रज्ञानानुसार लावलेली आहे. सुरुवातीला मी जर्मिनेटर लावून बियाणे टाकले. त्यानंतर रोपे तयार झाल्यानंतर त्याला लागवडीच्या अगोदर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ४० मिली + २० लि. पाणी याप्रमाणे घेवून त्यामध्ये रोपांच्या मुळ्या २० मिनिटे बुडवून लागवड ५ x २ फुटावर बेडवर केली. लागवडीनंतर लगेच तिसऱ्या दिवशी ठिबकमधून ५०० मिली जर्मिनेटर + ३०० मिली प्रिझम याप्रमाणे एकरी सोडले. मिरचीला ८ ते १० दिवसांनी नवीन शेंडा निघून ती चांगली, टवटवीत दिसायला लागली. मिरचीला त्यानंतर कल्पतरू १ बॅग + डी.ए.पी. २५ किलो + बेनसल्फ ५ किलो याप्रमाणे अर्धा रिंग पद्धतीने खते दिली. त्यानंतर ४ दिवसांनी पुन्हा जर्मिनेटर ३० मिली + प्रिझम २५ मिली + क्रॉपशाईनर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम/पंपास याप्रमाणे फवारणी केली. फवारणी झाल्यानंतर ४ दिवसांनी पुन्हा ठिबकद्वारे जर्मिनेटर ५०० मिली + बावीस्टीन १०० ग्रॅम + २ किलो १९:१९:१९ + १०० लि. पाणी या प्रमाणे सोडले.

असे एकूण ३ वेळा ड्रेंचिंग केले. आता मिरचीचे झाड उंच व चांगला घेराव घेण्यास सुरुवात झाली. १० दिवसांनी मिरचीच्या झाडाची उंची व घेर वाढण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये कोणाचेही मन रमेल अशी दिमाखदार मिरची दिसत होती. मिरचीच्या लागवडीपासून कंपनी प्रतिनिधी वराडे यांच्या सल्ल्यानुसार मिरचीला खते औषधे (फवारणी) व पाणी देत आहे. मिरची फुलावर येवून फळ धरण्यास सुरुवात झाली आहे.

डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा सल्ला प्रतिनिधी फोनवरून देत असे. त्याचबरोबर त्यांनी भरपुरदा आमच्या शेताला भेट दिली. जेव्हा आम्हाला आवश्यकता असते. तेव्हा ते आमच्या शेतावर येवून मोफत सल्ला देतात. त्यानंतर मी १५ दिवसांच्या अंतरांनी सप्तामृत फवारण्यास सुरुवात केली. दर १५ दिवसांनी मी मिरचीवर सप्तामृत फवारत असतो. त्यामुळे माझ्या मिरचीची फुलगळ /फळगळ होत नाही. त्याचबरोबर मिरचीवर बोकड्या, व्हायरस आलेला नाही. एका मिरचीच्या झाडाला ३०० ते ७०० पर्यंत मिराच्या लागलेल्या असल्यामुळे मिरचीचे झाड जमिनीच्या बाजूला वाकलेले आहे. म्हणजेच झाडापेक्षा मिरचीचे वजन भरपूर झालेले आहे.

डॉं. वावसाकार टेक्नॉंलॉजी शेतीला वरदान

दर तीन दिवसांनी मिरचीचा तोडा करावा लागत आहे. बाजारामध्ये मिरची पाहताच ताजी - तवानी दिसते. त्यामुळे ग्राहक आकर्षिक होतात व इतरांपेक्षा माझ्या मिरचीला भाव अधिक मिळतो. मी बावसकर तंत्रज्ञान वापरात असल्यामुळे माझ्या मिरचीचे देठ (नाक) हे हिरवेगार दिसतात. बाकी मिरच्यांचे देठ हे बाजारापर्यंत आणेपर्यंत काळसर पडते. त्यामुळे माल सुकलेले निस्तेज दिसतो. माझ्या प्लॉटमधील मिरचीवर असलेला ताजेपणा हा बाजारातपण कायम राहतो. त्यामुळे मी बजारात मिरची चढ्या भावाने विकतो. त्याचबरोबर मी डॉ. बावसकर तंत्रज्ञान वांगी, कारली या पिकावरही वापरतो. त्यामुळे तीही पिके चांगली आहेत. मी कपाशीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरात असल्यामुळे माझ्या कपाशीवर लाल्या आला नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ही माझ्यासाठी खूप फायद्याची आहे. माझ्या वाचक शेतकरी बंधुंना मी सांगू इच्छितो की, डॉ.बावसकर तंत्रज्ञान एकदा आवर्जुन नेऊन या महागड्या युगात वापरून बघा. त्यामुळे कमी खर्चात या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा हा तुम्हाला निश्चितच होईल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही भरपूर शेतकरी याचा अनुभव घेत आहोत. तुम्हीपण एकदा आल्या शेतातील पिकावर वापरावे व कमीत - कमी खर्चामध्ये चांगली शेती डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने करावी. अशी इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा सधन व सुखी होईल.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी हे एक तंत्रज्ञान शेतीसाठी व आजच्या युगात वरदानच ठरते आहे.

Related New Articles
more...