क्लासवन निवृत्ती अगोदर फळ शेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक !

श्री. प्रकाश यशवंतराव भोसले,
(गृह खात्यातील राजपत्रीत वर्ग - १ पदावरून सेवानिवृत्ती)
मु.पो. शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९४२२३१३११३


मी डिसेंबर २०१० साली निवृत्त होण्यापुर्वीच गावी ८ एकरमध्ये २००५ मध्ये राहुरी कृषी विद्यापीठातून चिकू, लिंबू, पेरू, केशर आंब्याची रोपे आणून कालीपत्ती चिकू २।। ते ३ एकरमध्ये १२० रोपे लावली आहेत. साई सरबती लिंबू ३।। एकरमध्ये २०' x २०' वर ४०० रोपे लावली आहेत. पेरू लखनौ - ४९ ची ६० रोपे १८' x १८' वर लावली आहेत. केशर आंबा १८' x १८' वर ५० रोपे लावली आहेत. तसेच अर्धा एकर मिक्स प्लॉटमध्ये २ - २, ४ - ४ झाडे संत्रा , मोसंबी, आवळा, नारळ, डाळींब, हनुमान फळ, सिताफळ, अंजीराची रोपे आणून घरच्यासाठी लावली आहेत.

लिंबूला २४ रू./किलो तर चिकूला १५ ते २० रू. किलो भाव

सर्व फळझाडांना ४ - ५ व्या वर्षी फळे सुरू झाली. डॉ. बावसकर तंत्रज्ञान आवश्यकतेनुसार वेळोवेळी वापरत आहे. येथील हवामान विचित्र आहे. लिंबूला जानेवारीत बहार लागून आषाढ महिन्यात फळे सुरू होतात. थंडीत याला भाव साधारण असतो. थंडीनंतर पुढेही माल चालूच राहतो. त्याला भाव चांगला मिळतो. आता सध्या फेब्रुवारीमध्ये २४ रू./किलो भाव मिळत आहे. म्हणजे २० किलोचा डाग असतो तो ४५० ते ५०० रू. ला जात आहे.

चिकूत 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आंतरपीक

चिकूला सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये फुले लागतात. डिसेंबरमध्ये फळे सुरू होतात. ती साधारण ८ महिने चालतात. चिकूला १५ ते २० रू./किलो भाव मिळतो. फळांचा आकार मोठा असल्याने एका किलोत ६ - ८ च फळे बसतात. फळे गोड, चवदार आहेत. सध्या झाडे पानोपान फळांनी लगडलेली आहेत. फुलकळी, बोरासारखी फळे, लिंबासारखी फळे आणि काढणीयोग्य फळे अशी ४ अवस्थेत कायम फळे चालू असतात. मध्यंतरी २००५ - २००६ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीवियानक' शेवग्याचे या चिकूत आंतरपीक घेतले होते. त्याचे ४ वर्षापर्यंत चांगले उत्पादन मिळाले. हा शेवगा गुलटेकडी, पुणे मार्केटला विकला. त्यावेळी २० ते २५ रू. किलो भाव मिळत होता. नंतर २००९ चिकूला फळे सुरू झाल्यानंतर शेवग्याची झाडे काढली.

पेरूची ६० झाडे - ११०० किलो दर २५ रुपये/किलो - महिन्याला २५ हजार

पेरूला सप्टेंबर - ऑक्टोबरला बहर लागतो. तो जानेवारीत चालू होतो. त्याला पाणी, खत आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत राहिलो की, वर्षभर फळे मिळतात. सध्या बहार चालू झाला असून परवा (१५ फेब्रुवारी २०१५) ३ क्रेट पेरू काढले. त्यानंतर आज (१७ फेब्रुवारी २०१५) ६ क्रेट निघाला. साधारण आठवड्याला ३०० किलो म्हणजे महिन्याला १००० ते १२०० किलो पेरू या ६० झाडांपासून निघतो. पेरूला सध्या ५०० रू. क्रेट भाव मिळत आहे. म्हणजे २५ ते ३० रू. किलोने जात आहे. त्यामुळे महिन्याला साधारण २५ हजार रू. मिळतात.

सर्व फळे शरद नामदेव म्हेत्रे गाळा नं. १७५, गुलटेकडी, पुणे मार्केटमध्ये विकतो.

आंब्यापासून १ लाख रुपये

गेल्यावर्षी आंबा ५० झाडांपासून ६ हजार फळे म्हणजे १।। ते २ टन माल निघाला होता. याला ६० ते ८० रू. किलो भाव मिळाला होता. साधारण १ लाख रू. चे उत्पन्न मिळाले. आता सध्या मोहोर भरपूर लागलेला आहे. आंब्यावरही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे गरजेनुसार वेळोवेळी स्प्रे घेत असतो. सरांनी सांगितले, "सर्व फळांना तुम्हाला मिळणारा भाव हा फारच कमी आहे. तेव्हा तुम्ही गावोगावोच्या स्थानिक आठवडे बाजारामधेय नेहमी माल विकावा."

आजुबाजुचे शेतकरी यशस्वी बागा पाहून आश्चर्यचकीत

२००५ मध्ये शासकीय सेवेत असताना शेतात जायचो. तेव्हा शेजारचे लोक म्हणायचे, "१२५ किलो मिटर एवढ्या लांबून येवून हा काय शेती करणार? आयुष्यभर नोकरी केली आहे. त्यांना माहिती आहे का शेती कशी करतात २ - ३ महिने करेल आणि देईल सोडून." पण आता डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने बहरलेल्या बागा पाहून आश्चर्यचकीत होतात व मला विचारतात. 'साहेब तुम्ही कशी शेती करता. कोणती औषधे खते वापरता? एवढ्या प्रतिकुल परिस्थितीत तुम्ही कसे हे साध्य केले? आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा." मी सध्या या शेती व्यवसायाबरोबरच २ वर्षापासून महाराष्ट्र राज्य लिंबू उत्पादक संघ, पुणे अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याचा संचालक म्हणून काम पहात आहे. आज या फळझाडांसाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञान घेण्यास आलो तेव्हा वरील अनुभव सरांना सांगितले. त्यावेळी सरांनी मला डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके व 'कृषी विज्ञान' मासिक भेट दिले.