तोंडली उत्पादक ७० - ८० गावातील शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात

श्री. मारुती महादेव हिंगे, मु.पो. अवसरी, ता. आंबेगाव, जि. पुणे. मोबा. ९७६७७५२८९७

तोंडलीची वेलापासून सुरूवातीला मे २०१३ मध्ये ८ गुंठ्यामध्ये लागवड केली होती. २० रू. प्रमाणे २५० रोपे आणली होती. लागवडीपासून ३० ते ४० दिवसात वेल मांडवापर्यंत जाऊन फुलकळी लागली. माल ४० - ४५ दिवसात चालू झाला. सुरूवातीला २ किलो, नंतर ५ किलो जसजसे वेल दाट होतील तसे उत्पादन वाढते. दिवसाड १०० किलोपर्यंत माल निघत होता. बारमाही तोडे चालतात. साधारण जानेवारी महिन्यात छाटणी करतो. मांडवावर गेलेला वेल १ फूट आडवा ठेवून बाकीचे छाटतो. छाटल्यावर १५:१५:१५, शेणखत जमिनीतून देतो. महिनाभर विश्रांती देतो. नंतर थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होताच पाणी सोडतो. त्यानंतर फुट वाढते. वेल वाढून कळी लागण्यास सुरुवात होते. त्यानंतर जसजसा फुटवा वाढेल, तसे कळीच्या प्रमाणात वाढ होते.

तोंडली माल मजुरांकडून ३० ते ४० किलोपर्यंत दिवसभरात तोडला जातो. घरचा माणूस असला तर ५० किलोपर्यंतही माल तोडलो. दाटी जर जादा झाली असली तर तोडणीस उशीर लागून कमी माल तोडला जातो.

सर्व माल वाशी मार्केटला पाठवितो. सध्या वाशीला १८० रू. १० किलो भाव मिळत आहे. तोंडलीवर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या गरजेनुसार फवारण्या करीत असतो, त्याने फुट वाढते. त्यामुळे नवीन कळी निघून माल जादा लागतो. भुरीवर हार्मोनी एकदा फवारले होते. ती काही प्रमाणात आटोक्यात आली होती तेव्हा आज सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी (९ फेब्रुवारी २०१५) आलो आहे. सरांनी सांगितले, "भुरीसाठी हार्मोनी ३०० मिली/१०० लि. पाणी सोबत प्रोटेक्टंट आणि स्प्लेंडर वापरा. म्हणजे भुरी १००% आटोक्यात येईल. तसेच इतर किडींचाही प्रादुर्भाव होणारा नाही. फलधारणा वाढून उत्पादन व दर्जातही वाढ होईल. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तोंडली लांबट, हिरवीगार मिळतील. त्यांचा टिकाऊपणा वाढून बाजारात इतरांपेक्षण जादा भाव मिळेल." गेल्यावर्षी आम्ही अजून २० गुंठे तोंडली जूनमध्ये लावली आहेत. त्याला देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेणार आहे. मी हुंडेकरी असल्याने वेळेअभावी शेतीकडे थोडे दुर्लक्ष होते. मजुरांची समस्या भेडसावते. आमच्या भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तोंडल्याचे उत्पादन चांगल्या प्रतीचे मिळत असल्याने येथील ७० - ८०% शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरतात.

१५ गुंठ्यात १ लाख ८५ हजार

गावातील सुरेंद्र विठ्ठल जाधव ह्यांची २७५ हुंड्यांची १५ गुंठे तोंडली आहेत. त्यांनी चालू वर्षी वर्षभरात १ लाख ८५ हजार रू. ची तोंडली विकली. ते नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. तसेच गंगाधर ज्ञानेश्वर टावरे यांची १० - १२ गुंठे तोंडली आहेत. तीदेखील पाहण्यासारखी असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले उत्पादन घेतात. त्यांच्या तुलनेत उत्पादनात आम्ही थोडे मागे आहोत. तेव्हा आमची एकच इच्छा आहे ई आमच्या भागात जवळपास १५ एकर तोंडली लागवड आहे. तेव्हा कंपनीचे प्रतिनिधींनी प्लॉटवर येवून पीक परिस्थितीनुसार कोणत्या अवस्थेत कोणती खते, औषधे वापरावीत, याविषयी मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक सुलभ होऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने खात्रीशीर उत्पादन घेता येईल. तेव्हा नारायणगाव येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'कृषी विज्ञान केंद्र' आहे तेथे संपर्क करावा.

आमच्या अनुभवानुसार छाटणीनंतर सुरुवातीला कळी चांगली येते. अशी तोंडली लांब मिळतात. नंतर ती आखूड निघू लागतात. बाजारभावाच्या बाबतीत पावसाळ्यात तोंडलीला भाव अधिक असतो. आम्हाला या काळात ८०० रू./१० किलो भाव मिळाला आहे. या काळात पाऊस असल्याने फुलात पाणी जाऊन ते सडते. यामुळे फळधारणा कमी होऊन मार्केटमध्ये माल कमी येतो. त्यामुळे भाव तेजीचे राहतात. थंडीत देखील तोंडलीचा माल कमी निघतो. उन्हाळ्यात माल जादा निघतो. पण तोंडली गिड्डी (आखूड) निघून त्यातील बी जाड होते.

नारायणगावहून साधारण १० किमीवर वारूळ वाडीरोडला सावरगाव आहे. तेथे तोंडल्याचे क्षेत्र भरपूर आहे. तेथे पाणी भरपूर असून तेथे तोंडली, ऊस टोमॅटो जास्त आहे. तेथून २ वर्षा पुर्वी आम्ही तोंडल्याच्या हुंड्या आणल्या होत्या. त्याची लागवड ८ गुंठ्यात केल्यावर गेल्यावर्षी पुन्हा २० गुंठे लागवडीस आमच्याकडीलच काड्या वापरल्या. आता २८ गुंठे तोंडली चालू आहेत.

Related New Articles
more...