टँकरने पाणी देऊन १ एकर गोट कांद्यापासून ११८ पायली बीजोत्पादन, दर ३७५ रू./पायली

श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग कर्डीले,
मु.पो. कडा, ता. आष्टी, जि. बीड,
मो.नं. ८६०५३८१८८८मी दरवर्षी १ एकर गोट कांद्याचे (कांदा बीजोत्पादन) पीक घेत असतो. पाणी कमी असल्यामुळे बाकी जमिनीमध्ये ज्वारी, हरभरा अशी पिके घेतो. लागवडीसाठी लागणारे कांदा बी घरीच तयार करतो. हा गोट कांदा ऑक्टोबर महिन्यात लावतो.

गेल्यावर्षी १ एकर गोटासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे अहमदनगर येथून आणून गोट साधारण १।। महिन्याचे असताना जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली यांची १०० लि. पाण्यातून फवारणी केली व १ लिटर जर्मिनेटर ठिबकमधून सोडले. त्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली व फूट चांगली होऊन चकाकी आली. तसेच दुसरी फवारणी एक महिन्यानंतर जर्मिनेटर ३०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + राईपनर ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. तर दोन महिने पाणी विकत टँकरने घातले तरी बोंडांचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन बी ठसठशीत, वजनदार भरले. त्यामुळे चाळीस गुंठ्यामध्ये ११८ पायली (३७५ किलो) बी मिळाले व ते बी घरी येऊन शेतकऱ्यांनी ५००० रू./पायली भावाने विकत नेले.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दरवार्षापेक्ष पाणी कमी असून उत्पादनामध्ये २५ ते ३०% वाढ झाली. चालू वर्षी कल्पतरू खत व पुर्ण औषधे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची वापरली. यासाठी कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब कर्डीले (मो. ९४०३६९९२२८) यांचे मार्गदर्शन मिळाले.