लिंबू व कपाशीतील आंतरपीक ५०० 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पहिल्या वर्षी ९० हजार, दुसऱ्या बहाराचे १ लाख २५ हजर तर तिसऱ्याचे अजुन वाढेल

श्री. संतोष अर्जुन जाधव, मु.पो. भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव - ४२४१०५. मो. नं. ९४२१६३८६९७

मी भडगावात शिक्षक म्हणून ३० वर्षे नोकरी करित शेती व्यवसाय सांभाळत होतो. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आमच्या भागातील शिवणी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात मोरिंगा शेवग्याची कपाशीत आंतरपीक म्हणून लागवड केलेली होती. त्यानंतर मी माझ्या दोन एकरांतील लिंबू पिकात १०' x १०' अंतरावर मोरिंगा शेवग्याच्या लागवडीसाठी आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी जळगाव येथून बियाण्यांची १० पाकिटे आणून त्यांची जर्मिनेटरमध्ये बीजप्रक्रिया करून लागवड जून २०१३ च्या पहिल्या आठवड्यात केली. त्याला ठिबकद्वारे पाणी दिले व त्यात प्रत्येक झाडाला २ पाटीप्रमाणे एकूण ३ ट्रॉली शेणखत व कल्पतरू दिले. पहिल्यावर्षी लिंबू, कपाशी, शेवगा ही आंतरपिके घेतली. दोन महिन्यात शेवग्याची (शेंडे) छाटणी केली. त्यानंतर दर १५ -२० दिवसांच्या अंतराने खुडणी केली. प्लॉट ४ - ५ महिन्याचा झाल्यावर फुले दिसू लागली व डिसेंबर महिन्यात शेंगा तोडणीला सुरुवात झाली.

त्यानंतर पहिल्यावर्षी मला शेवग्याच्या ५०० झाडांपासून ९०,००० रू. उत्पन्न झाले. दुसऱ्यावर्षी आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. रविंद्र चौधरींच्या मार्गदर्शनाने थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट अशा औषधांच्या फवारण्या करून व कल्पतरू खत वापरून गेल्यावर्षी उत्पन्नात वाढ होवून मला १ लाख २५ हजार रू. उत्पन्न झाले. यावर्षी मे (२०१५) महिन्यात खरड छाटणी करून त्याला कल्पतरू दिले व दोन महिन्यानंतर शेंडे छाटणी सुरू ठेवली. तर नोव्हेंबर (२०१५) महिन्यात शेंगा तोडणीस सुरुवात झाली. सरासरी ५० रू. किलो भावाने भडगाव, पाचोरा मार्केटमध्ये विक्री केली व आतापर्यंत मला ५०० झाडांपासून १ लाखाचे उत्पन्न झाले असून मे २०१६ पर्यंत मला एकूण १।। - २ लाखांचे उत्पन्न निघेल असे वाटते. 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा आम्हाला खरोखर वरदान ठरला आहे. लिंबुसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असल्याने त्याचेही चांगले उत्पन्न मिळते.

Related New Articles
more...