नांगरून टाकण्याच्या अवस्थेतील कांदा निरोगी २० गुंठ्यात ८० ते ९० क्विंटल उत्पादन अपेक्षित

श्री. बी. ए. लोखंडे,
मु. पो. चांदवड, २६ अ, शिदुस्मृती, गुरुकुल सोसायटी, एस. टी. स्टँडमागे, ता. चांदवड, जि. नाशिक
मोबा. ९४२३५३९५८६मी एक शिक्षक असून उत्तम शेती करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. मी एकदा पिंपळगाव बसवंत येथील एस. टी. स्टँडवर थांबलो असता तेथील न्युज पेपर एजन्सीकडे माझे लक्ष गेले. तेथे मला डॉ. बावसकर सरांची 'कृषी विज्ञान' व डाळींब विषयक पुस्तके दिसली. मी ती विकत घेतली व पुस्तकात बी. ए. अॅग्रो एजन्सी, पिंपळगाव यांचे कार्ड लावलेले आढळून आले. नंतर मी पुस्तके वाचली व बी. ए. अॅग्रो येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींशी भेट घेतली, त्यावेळी माझ्याकडे २० गुंठे कांदा पुर्णपणे खराब झालेला होता. नंतर प्रतिनिधींनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली व जर्मिनेटर + थाईवर + क्रॉंपशाईनर + प्रिझम प्रत्येकी ५० मिली प्रति पंपास (१५ लि. पाणी) घेऊन स्प्रे करण्याचा सल्ला दिला. नंतर मी त्याप्रमाणे स्प्रे केला. आठ दिवसांच्या आत कांदा पुर्णपणे हिरवागार झाला मी खुश झालो, कारण जो कांदा मी नांगरून टाकणार होतो. तो कांदा पुर्णपणे तेजदार झाला. नंतर मी सप्तामृताचे दोन स्प्रे दिले. आज २० गुंठ्यामध्ये ८० ते ९० क्विंटल कांदा निघेल, हे मला केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच शक्य झाले.

तसेच कांदा बियाणे तयार करण्यासाठी गोट कांदा जर्मिनेटच्या द्रावणात भिजवून २ तासानंतर लागवड केली. परिणामी फुटवे भरपूर निघाले. नंतर जर्मिनेटरची १५ दिवसांनी ड्रेंचिंग केली. वाढ व्यवस्थित झाली, गोंडा पण मोठा भरगच्छ निघाला.

तसेच वरील अनुभव मी स्वत: घेतल्यामुळे माझ्याकडे ४०० मृदुला जातीची ६ महिन्यानी डाळींब झाडे आहेत. त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने टेक्नॉंलॉजीचा अवलंब आतापासूनच सुरू केला व मला झाडाची वाढ व मुळी व्यवस्थितपणे कार्य करत असल्याचे आढळून आले. आता डाळींब पिकासाठी मी या तंत्रज्ञानाचा पुर्णपणे वापर करणार आहे.