३ महिन्यात १ एकरात टरबुजापासून ३ लाख रुपये

श्री. केदा वामन सोनवणे,
मु. पो. वायगाव, ता. सटाणा, जि. नाशिक.
मोबा. ९७६४६६९९२४मी १ एकर टरबुजाची लागवड २७ डिसेंबरला केली. नामधारी २९५ या जातीची लागवड केली. लागवड इनलाईनवर सरीवरंब्यावर केली. दोन सरीतील अंतर ७ फुट व दोन रोपातील अंतर एक फूट असे ठेवले. बी लागवड करताना बियाणे १ लि. पाणी + ३० मिली जर्मिनेटर या द्रावणामध्ये ३ - ४ तास भिजवून घेतल्यानंतर लागवड केली. त्यामुळे बी लवकर व १०० % उगवले, शिवाय मर अजिबात झाली नाही.

उगवणीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनेर + किटकनाशक यांची फवारणी केली. त्यामुळे वेलीची जोमदार वाढ व्हायला सुरवात झाली. नंतर १५ दिवसांनी सप्तामृताची दुसरी फवारणी केली. त्यामुळे वेलीची वाढ उत्तम झाली.

सप्तामृतमध्ये प्रत्येक फवारणीत हार्मोनीचा वापर केला, त्यामुळे माझ्या प्लॉटवर करपा, भुरी या रोगाचा अजिबात प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे उत्पन्न भरघोस मिळाले. (संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिला आहे.) टरबुजाची साईज सरासरी दहा ते साडे दहा किलो पर्यंत मिळाली. एकरी उत्पन्न सरासरी ३६ टनापर्यंत मिळाले. मुस्ताक भाई (९४२२७९०४४४) या जळगावच्या व्यापाऱ्याला ८५० रू. क्विंटल ने माल दिला. एका एकरात मला ३ लाख रू. उत्पन्न मिळाले.

मला ३ महिन्यात ३ लाख रू. उत्पन्न फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कसमादे पट्ट्यातील प्रतिनिधी श्री. संतोष ढगे यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळाले.