रासायनिक खारच्या जादा वापराने कोमेजलेला प्लॉट सुधारून २॥ एकरात एका तोड्यास २७०० किलो झेंडू

श्री. पांडुरंग भिमराव माने, मु. पो. झाकले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
मोबा. ९०११३५३६५४


आम्ही २००४ पासून झेंडूची लागवड करीत आहोत. जानेवारी २०१२ मध्ये भिमा कृषी प्रदर्शनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर आमच्याकडे २॥ एकर गोल्डन झेंडूसाठी जर्मिनेटरचा वापर करण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात रासायनिक खतांच्या जादा वापरा मुळे झेंडूच्या २ एकर प्लॉटवर त्याचा दुष्परिणाम होऊन झेंडूची ४० % बाग कोमेजून गेली होती. त्यानंतर मोरेंच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटरचा वापर करण्यास सुरुवात केली. २ एकरसाठी ४ लि. जर्मिनेटर ड्रिपद्वारे सोडण्यात आले. त्यानंतर ४ दिवसांनी सप्तामृत औषधांची फवारणी सल्ल्याप्रमाणे केली. या दोन्हीमुळे बाग हळुहळू सुधारल्याचे जाणवले. आता तोडेही चांगल्याप्रकारे चालू आहेत. पुर्ण प्लॉटचा एक तोडा ६ दिवस चालतो. या २।। एकरातून ६ दिवसाच्या एक तोड्याला २७०० किलो झेंडू निघाला आहे. तो २५ रू./किलो प्रमाणे विकला. १८ एप्रिल २०१२ ला दुसरा तोड सुरू केला आहे. आज पहिल्या दिवशी अर्ध्या एकरातील माल तोडून झाला तर ७०० किलो माल निघाला आहे. अजून २ एकरची तोडणी ४ - ५ दिवस चालेले. म्हणजे साधारणपणे एका तोड्याला ३ हजार किलोहून अधिक माल निघेल. प्लॉट सध्या पुर्णत: निरोगी आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चांगले पैसे होतील अशी परिस्थिती आहे.